लोणावळा/पुणे: पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या लोहगड किल्ल्यावरील संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता पूर्णपणे हत्येचे स्वरूप आले असून, पोलिसांचा तपास अत्यंत वेगाने सुरू आहे. या प्रकरणात लोणावळा ग्रामीण (Ketan Agarwal Death Case) पोलिसांनी आता आरोपी सिया गोयल हिचा भाऊ साहिल गोयल याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 'एबीपी'शी (ABP News) बोलताना लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी तपासाबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली.(Ketan Agarwal Death Case)
पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी सांगितले की, "केतन अग्रवालची हत्या केल्यानंतर सिया जेव्हा घरी परतली, तेव्हा तिने घरातील कोणाला याबद्दल काही सांगितले होते का? तसेच केतनचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर नेमके कसे हावभाव होते, ती घाबरलेली होती की सामान्य होती? या आणि अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजून घेण्यासाठी तिचा भाऊ साहिल याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे." पोलीस गेल्या अनेक तासांपासून साहिलची कसून चौकशी करत असून त्याचा सविस्तर जबाब नोंदवला जात आहे.(Ketan Agarwal Death Case)
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी आतापर्यंत ८ ते १० संशयित आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले आहेत. यासोबतच, तांत्रिक आणि वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) पथकाला पाचारण करण्यात आले आहे. केतनला जेव्हा ४०० फूट खोल दरीत ढकलण्यात आले, तेव्हा त्याचे रक्ताचे डाग (Blood Stains) किल्ल्याच्या कड्यावर किंवा दगडांवर कुठे लागले आहेत का, याचा शोध फॉरेन्सिक टीम घेत आहे. तसेच वरून खाली कोसळत असताना केतनचा मृतदेह कोणकोणत्या ठिकाणी आणि कसा टकरावला असेल, हे समजून घेण्यासाठी फॉरेन्सिकचे पथक वेळोवेळी लोहगडावरील घटनास्थळाला भेटी देऊन बारकाईने निरीक्षण करत आहे.(Ketan Agarwal Death Case)
या संपूर्ण प्रकरणाचा तपास फॉरेन्सिक अहवाल, तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे अंतिम टप्प्याकडे नेण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे, जेणेकरून न्यायालयात आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याविरुद्ध भक्कम पुरावे सादर करता येतील.
लोहगडाच्या पायथ्याला.... घरातून आठ वाजता निघालेले केतन आणि सिया आलिशान गाडीतून 9 वाजून 20 मिनिटांनी पोहचले. तिकीट घर, इथल्या सीसीटीव्हीत सिया आणि चेतनचे हावभाव कैद झाले, वेळ 9 वाजून 43 ते 9 वाजून 45 मिनिटांची... चेतनचा हुडीतील फोटो, सिया- केतनने तिकीट काढलं, पण चेतन तिकीट न काढताच पुढं गेला. 10 वाजून 5 मिनिटांनी सिया आणि केतन गडावर पोहचले, केतन ट्रेकिंगचा आनंद घेत होता, सियाच्या मनात वेगळंच सुरु, तर मृत्यूच्या रूपाने चेतन काही फुटांवरून पाठलाग करत होता. 15 मिनिटं लोहगडाच्या कानाकोपऱ्यातून निर्मनुष्य ठिकाणी केतनला घेऊन सिया पोहचली. वेळ 10 वाजून 25 मिनिटांची. या घटनास्थळाची तिने आधीचं रेकी केली होती. मागे चेतन दबा धरुन बसला होता. फोटोची पोज देत असताना दोघांमध्ये झटापट, मग चेतन येतो आणि केतनला दरीत ढकलून दिलं जातं. अपघाताचा बनाव रचला जातो, मग बिंग फुटते. केतन शेवटच्या 75 मिनिटांत आयुष्याची बरीचं स्वप्न पाहतो. मात्र ही सर्व स्वप्न अधुरी राहतात.