'हे' आहेत 2026 मधील सर्वाधिक सॉफ्टवेअर सपोर्ट असलेले सर्वोत्तम स्मार्टफोन्स
Tv9 Marathi June 26, 2026 07:45 PM

आपल्यापैकी अनेकजण नवीन फोन खरेदी करताना परफॉर्मन्स, बॅटरी लाईफ, कॅमेरा आणि चार्जिंग स्पीड यांसारख्या वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित करत असतात. मात्र अशी काही लोकं आहेत जे स्मार्टफोन खरेदी करताना फोनला किती वर्षांचा सॉफ्टवेअर सपोर्ट मिळतो याचाही विचार करतात. कारण दीर्घकाळ अपडेट्सचे ‍मिळत असल्यास डिव्हाइसेस सुरक्षित राहतात आणि कालांतराने त्यांना नवीन फीचर्स मिळतात. अनेक स्मार्टफोन ब्रँड्सनी त्यांच्या सॉफ्टवेअर पॉलिसीमध्ये सुधारणा केली आहे. अशातच गूगल पिक्सल लाइनअप, सॅमसंग गॅलेक्सी एस26 सिरीज ते ॲपल आयफोन 17 सिरीजपर्यंत अशा काही स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेणार आहोत जे दीर्घकाळ सॉफ्टवेअर सपोर्टसह येतात.

गुगल पिक्सेल 10 सिरीज

गुगलची नवीन पिक्सेल 10 सिरीज विस्तारित सॉफ्टवेअर सपोर्टसह येते, ज्यामध्ये पिक्सेल 10, पिक्सेल 10 प्रो आणि पिक्सेल 10 प्रो एक्सएल यांसाठी सात वर्षांच्या सॉफ्टवेअर सपोर्टचा समावेश आहे. हे डिव्हाइसेस अँड्रॉइड 16 सह लाँच झाली होती आणि त्यांना आधीच अँड्रॉइड 17 मिळाले आहे. त्यांना अँड्रॉइड 23 येईपर्यंत सपोर्ट मिळत राहील. गुगल सात वर्षांसाठी मासिक सुरक्षा पॅचेस आणि सात वर्षांसाठी ‘पिक्सेल ड्रॉप्स’ देण्याचे आश्वासनही देत ​​आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस26 सिरीज

गुगलप्रमाणेच सॅमसंगच्या नवीनतम गॅलेक्सी एस26 सिरीजला, ज्यात गॅलेक्सी एस26, गॅलेक्सी एस26 प्लस, आणि गॅलेक्सी एस26 अल्ट्रा यांचा समावेश आहे. हे फोन्समध्ये सात वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स मिळतील. सर्व डिव्हाइसेस अँड्रॉइड 8.5 वर आधारित वन यूआय 16 सह येतात.

आयफोन 17 सिरीज

ॲपल आयफोनची ही नवीन सिरीज गेल्या वर्षी लाँच करण्यात आली होती. कंपनी आयफोनसाठी मिळणाऱ्या सॉफ्टवेअर अपडेट्सची नेमकी वर्ष सांगितलेले नसले तरी कंपनीचा आतापर्यंतचा अनुभव पाहता, असा विश्वास आहे की या सिरीजला अंदाजे सात वर्षांसाठी सॉफ्टवेअर आणि सुरक्षाविषयक सपोर्ट मिळेल. ही लाइनअप iOS 26 सह लाँच झाली होती आणि iOS 33 पर्यंत तिला सपोर्ट मिळत राहण्याची अपेक्षा आहे. या सिरीजमध्ये आयफोन 17, आयफोन एअर, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स यांचा समावेश आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.