Tomato Cultivation Technology: शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहेत. ग्रामीण भागातील अनेक तरुण शेतकरी चॅटजीपीटी आणि एआय द्वारे शेतीतील काही अभिनव प्रयोग करून पाहत आहेत. देशातूनच नाही तर परदेशातून काही वाण विकत घेऊन येथील परिस्थिती, हवामानाचा अंदाज घेत विविध फळं घेत आहेत. सेंद्रिय शेतीकडेही अनेक जण वळले आहेत. शेतीत अशा सुधारणा होत असतानाच एक परंपरागत पद्धतीची आजही चर्चा होत आहे. टोमॅटोच्या भरघोस उत्पादनसाठी झाडांना हलवणे पुरसे आहे, असा दावा करण्यात येतो. त्याविषयी अनेक शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम आहे. काय आहे त्यावर तज्ज्ञांचे मत?
टोमॅटोच्या झाडांना हलविल्याने उत्पादन वाढते?
टोमॅटोच्या झाडांना हलके हलवले तर यामुळे जास्त फळं लागतात, उत्पादन अधिक वाढते. टोमॅटो बहरतो. टोमॅटो अधिक प्रमाणात येतात असा दावा हौशी बागकाम करणाऱ्यांनी केला आहे. अर्थात हा काही हवेतील दावा नाही. त्यांनी निरीक्षण, परीक्षण आणि अनुभवातून हा दावा केलेला आहे. देशातील अनेक ठिकाणी गच्चीवरील शेती, बागकाम असे अभिनव प्रयोग सुरू आहेत. त्यातील काहींनी हा अनुभव शेअर केला आहे. त्यांचा तसा दावा आहे.
काय आहे त्यामागील कारण?
टोमॅटोच्या झाडांना हलकेपणाने हलवल्यास टोमॅटोचे भरघोस उत्पादन येते अथवा वाढते असा दावा आहे. त्यामागे काही कारणं ही देण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते टोमॅटोचे फूल हे self-pollinating गटातील असते. म्हणजे काय तर, टोमॅटोचे झाड हे स्वत:च परागण करून फळे तयार करू शकते. पण जेव्हा झाड अशा ठिकाणी लावण्यात येते, जिथे पुरेशा प्रमाणात हवा येत नाही. हवेचा योग्य प्रवाह नसतो. जसे की बाल्कनी, कमी जागेतील कुंड्या, अशावेळी पराग योग्यप्रकारे पसरत नाहीत.
जर अशाठिकाणच्या झाडांना हळुवारपणे हलवले तर पराग पसरतो आणि परागीभवन pollination ची प्रक्रिया गतिमान होते. जिथे नैसर्गिक हवा अधिक आहे. कीटक कमी आहेत, अशा ठिकाणी ही पद्धत फळ वाढवण्यासाठी योग्य ठरते, असे तज्ज्ञांचे मत आहे. या प्रक्रियेमुळे फूल फळात बदलण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते. उत्पादनात बदल जाणवतो. पण झाडांना जोरात हलवले तर फळधारणेवर परिणाम होतो. फांद्या कमकुवत होऊ शकतात. फुलं गळून पडू शकतात आणि हा प्रयोग सपशेल फसू शकतो. त्यामुळे टोमॅटोचे झाड हलवण्याची प्रक्रिया ही अत्यंत हलक्या हाताने आणि नियंत्रित पद्धतीनेच करणे फायद्याचे ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.