Mumbai Water Supply: मुंबईवर कपातीचे संकट! धरणांनी गाठला तळ, अत्यल्प पावसामुळे चिंता
esakal June 27, 2026 04:45 PM

मुंबई : शहराची तहान भागवणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात जून महिना संपत आला तरी अपेक्षित पाऊस झालेला नाही. महापालिकेच्या आजच्या आकडेवारीनुसार सर्व धरणांमधील मिळून एकूण उपयुक्त पाणीसाठा अवघा १,०८,९६७दशलक्ष लिटर म्हणजेच ७.५३ टक्के इतकाच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पावसाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक मानली जात आहे. गेल्या वर्षी याच तारखेला धरणांमध्ये तब्बल ३५.९७ टक्के पाणीसाठाउपलब्ध होता, तर २०२४ मध्ये तो ५.२८ टक्के होता. यंदा पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे चिंतेचे वातावरण आहे. धरणांच्या क्षेत्रात पावसाची अत्यंत संथ सुरुवात झाली. भातसा (८८ मिमी), तानसा (९८ मिमी) आणि मध्य वैतरणा (७१ मिमी) धरण क्षेत्रात आतापर्यंत १०० मिमीचा टप्पाही ओलांडता आलेला नाही.

Mumbai Local Megablock: महिन्याचा शेवटचा रविवार त्रासदायक! लोकल उशिराने धावणार; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक

गेल्या २४ तासांत तर या भागात केवळ २ ते ८ मिमी एवढाच किरकोळ पाऊस पडला. दुसरीकडे अप्पर वैतरणा धरण क्षेत्रात आतापर्यंत ३७६ मिमी पाऊस झाला असला तरी धरणाचीपाणीपातळी सध्या नीचांकी पातळीच्या खाली गेली आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या या धरणातील उपयुक्त साठा सध्या शून्य दाखवत असून, तिथून आपत्कालीन पाण्याचा उपसा सुरू आहे. मुंबईच्या अंतर्गत भागात असलेल्या विहार आणि तुळशी तलाव परिसरात काही प्रमाणात समाधानकारक पाऊस झाला आहे.

धरणांची सद्य:स्थिती (२६ जून स.६ वा.)
  • अप्पर वैतरणा : ८ पाऊस (मिमी), 0 उपयुक्त साठा (द.ल.लि.) - 0%

  • तानसा : ९८ पाऊस (मिमी), १,६३६ उपयुक्त साठा (द.ल.लि.) - १.१३%

  • भातसा : ८८ पाऊस (मिमी), ४६३७१ उपयुक्त साठा (द.ल.लि.) - ६.४७%

  • मध्य वैतरणा : ७१ पाऊस (मिमी), २१,८०४ उपयुक्त साठा (द.ल.लि.) - ११.२७%

  • मोडक सागर : ५९ पाऊस (मिमी), २४,८४५ उपयुक्त साठा (द.ल.लि.) - १९.२७%

  • तुळशी : २८९ पाऊस (मिमी),१७३० उपयुक्त साठा (द.ल.लि.) - २१.५०%

  • विहार : २८९ पाऊस (मिमी), १७३० उपयुक्त साठा (द.ल.लि.) - २१.५०%

एकूण साठा -१,०८,९६७ द. ल. लि. ७.५३ टक्के

Mumbai: मळमळ होते सांगून टॅक्सी थांबवली; नंतर प्रसिद्ध व्यावसायिकाने सी-लिंकवरून उडी घेतली, कारण काय? पाणी जपून वापरा

मुंबईला धरणांमधून द्ररोज ३,९०० द.ल. लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्याचा साठा पाहता हा साठा मर्यादित काळासाठीच पुरू शकतो. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत धरण परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे; मात्र तोपर्यंत पाणी जपून वापरा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.