Nanded: देगलूरच्या हॉटेलांमध्ये अन्नसुरक्षेचा बोजवारा; पेपरवरच खाद्यपदार्थांची विक्री; अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
esakal June 27, 2026 04:45 PM

देगलूर: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर अन्नसुरक्षेबाबत धडक कारवाईला वेग आला असून अनेक व्यावसायिकांमध्ये धडकी भरली आहे. मात्र देगलूर शहर व परिसरात या कारवाईचा कोणताही परिणाम दिसून येत नसल्याचे चित्र आहे. शहरातील अनेक चौकांमधील हॉटेले, उपाहारगृहे, नाश्ता केंद्रे आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये आजही नियमांची सर्रास पायमल्ली होत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे.

शहरातील अनेक हॉटेलांमध्ये गरमागरम भजी, वडे, समोसे, पोहे, इडली, डोसे आदी खाद्यपदार्थ थेट वर्तमानपत्राच्या कागदावर किंवा छापील कागदावर देण्यात येत आहेत. शाईयुक्त वर्तमानपत्रातील रसायने गरम पदार्थांच्या संपर्कात आल्यास ती अन्नामध्ये मिसळून आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांकडून वेळोवेळी देण्यात आला आहे. तरीही या प्रकाराकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.

Chhatrapati Sambhajinagar: तलवारीचा धाक दाखवत शेतकऱ्याला जीवे मारण्याची धमकी; दोघांविरुद्ध पाचोड पोलिसांत गुन्हा अस्वच्छतेचा कळस....!

अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवले जातात. धूळ, माशा, कीटक यांचा त्यावर मुक्त संचार होत असतो. काही हॉटेल परिसरात दुर्गंधी, अस्वच्छ स्वयंपाकगृहे, सांडपाणी तसेच स्वच्छतेचा पूर्ण अभाव असल्याचे चित्र पाहायला मिळते. ग्राहकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणे, हात धुण्याची योग्य व्यवस्था नसणे, भांडी स्वच्छ धुतली जात नसल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

तपासणी पथकाची अनुपस्थिती...!

अन्न व औषध प्रशासनाकडून नियमित तपासण्या होणे अपेक्षित असताना देगलूरमध्ये अशा कारवाया अत्यंत दुर्मिळ झाल्याचे बोलले जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई होत नसल्याने अनेकांनी नियम धाब्यावर बसविल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Premium|SpaceX IPO Valuation : स्पेसएक्सच्या विक्रमी आयपीओने अंतराळ अर्थव्यवस्थेच्या नव्या युगाला दिली गती नागरिकांची कारवाईची मागणी...!

राज्यात अन्य ठिकाणी सुरू असलेल्या धडक मोहिमेच्या धर्तीवर देगलूर शहरातील सर्व हॉटेले, खाद्यपदार्थ विक्री केंद्रे आणि उपाहारगृहांची विशेष तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. अन्नसुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न मिळावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

देगलूर: शहरासह परिसरातील हॉटेलमध्ये सर्रासपणे पेपर वरच खाद्यपदार्थाची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.