दिल्ली हादरली, राजधानीसह भारतातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के
Tv9 Marathi June 27, 2026 11:45 PM

मोठी बातमी समोर येत आहे, दिल्ली-एनसीआर सह भारताच्या अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचं केंद्र अफगाणिस्तानमधील हिंदूकुश क्षेत्रामध्ये 191 किलोमीटर एवढं खोल आहे. या भूकंपाची तीव्रता 5.9 रिस्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानच्या हिंदूकुश क्षेत्रात शनिवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी 6.2 रिश्टल स्केल तीव्रतेचा भूंकप आला.राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (National Centre for Seismology) ने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचं केंद्र पूर्वोत्तर अफगाणिस्तानमधील कालाफगान पासून जवळपास 81 किलोमीटर दूर 36.442 ° उत्तर अक्षांश आणि 70.672 ° पूर्व रेखांशादरम्यान होते. या भूकंपाचे धक्के चीन, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, किर्गिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि भारतामध्ये जाणवले.

दिल्ली एनसीआरमध्ये काही सेकंद या भूकंपाचे धक्के जाणवले, या भूकंपाच्या घटनेमध्ये अजूनपर्यंत तरी कुठलीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्याची बातमी समोर आलेली नाहीये. तज्ज्ञांच्या मतानुसार या भूकंपाचा केंद्रबिंदु जमिनी खाली खूप खोल असल्यामुळे अनेक देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मात्र या भूकंपामुळे कुठेही फारस नुकसान झालेलं नाहीये. अफगाणिस्तानचा हिंदूकुश परिसर हा भूकंपप्रवण क्षेत्र आहे. या भागात यापूर्वी देखील अनेकदा भूकंपाच्या घटना घडल्या आहेत, अता पुन्हा एकदा या भागात  6.2 रिश्टल स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. या भूकंपाचे धक्के भारतात देखील जाणवले आहेत.

EQ of M: 6.2, On: 27/06/2026 19:04:51 IST, Lat: 36.442 N, Long: 70.672 E, Depth: 215 Km, Location: Afghanistan.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @DrNKalaiselvi @GSuresh_NCS @ndmaindia pic.twitter.com/lD494VYeiW

— National Center for Seismology (@NCS_Earthquake) June 27, 2026

जम्मू -काश्मीरमध्ये देखील या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. लोकंळर घर आणि ऑफिरमधूनबाहेर पळाले. जम्मू काश्मीर देखील भूकंपाच्या दृष्टीकोनातून फारच संवेदनशील भाग आहे. राज्यात यापूर्वी देखील अनेकदा कमी आणि मध्यम तीव्रतेचे भूकंप झाले आहेत. या भूकंपाचे नोंद 6.2 रिस्टल स्केल एवढी नोंदवण्यात आली आहे, हा एक मोठा भूकंप मानला जातो, यामुळे प्रचंड नुकसान देखील होऊ शकतं. मात्र या भूकंपामध्ये फार काही नुकसान झालेलं नाहीये.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.