Monsoon Update पूर्वोत्तर भारतात अतीवृष्टीचा इशारा
Marathi June 28, 2026 12:25 AM

प्रतिनिधी पुणे
पूर्वोत्तर भारतातील आसाम, सिक्कीम तसेच अरुणाचल प्रदेशमध्ये पुढील दोन दिवस अतीवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय पश्चिम बंगाल, ओरिसामध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
बंगालच्या उपसागरात हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय ओरिसा व छत्तीसगड लगत देखील हवेची द्रोणीय स्थिती असल्याने शनिवारपासून पूर्व तसेच पूर्वोत्तर भारतात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

सिक्कीमच्या अनेक भागाला शनिवारी मुसळधार पावसाने झोडपले. पुढील दोन दिवस या भागात पावसाच इशारा देण्यात आला आहे. यात रविवारी सिक्कीम, आसाम, अऊणाचलप्रदेशमध्ये अतीवृष्टीचा रेड अलर्ट, पश्चिम बंगाल व ओरिसामध्ये मुसळधार पावसाच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी सिक्कीममध्ये रेड अलर्ट असून, इतर भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे
राज्यभर पावसाच्या सरी
राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली असून, अनेक भागात मध्यम स्वऊपाच्या पावसाचा यलो अलर्ट देण्ण्यात आला आहे. शनिवारी कोकण पट्ट्यात पावसाचा जोर अधिक होता. मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रातही पावसाने दमदार हजेरी लावली. राज्याच्या बहुतांश भागात रविवारी पावसाचा अंदाज आहे. यात रत्नागिरी, रायगडमध्ये पावसाची तीव्रता अधिक असेल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.