Rahuri Mystery: राहुरीत अनोखे रहस्य! शब्बीर जिवंत परतल्याने प्रशासन हादरले; कबरीतील मृतदेह कोणाचा, डीएनए अहवालावर नजर..
esakal June 28, 2026 03:45 PM

राहुरी : सोनगाव येथे शब्बीर जमादार मन्सुरी यांना मृत समजून दफन करण्यात आला. ते काही दिवसांनी घरी परतले. त्यामुळे कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान, दफन केलेला मृतदेह कुणाचा? हे गूढ उकलण्यासाठी गुरुवारी (ता. २५) प्रशासनाने कब्रस्थानातील मृतदेह बाहेर काढून जागेवरच उत्तरीय तपासणी केली. डीएनए तपासणीसाठी नमुने संकलित केले.

Deool Band 2: ‘देऊळ बंद-२’ ची कमाई आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी; प्रवीण तरडे-कैलास वाणी, साईबाबांच्या शिर्डीत संकल्प जाहीर

राहुरीचे नायब तहसीलदार सोपान बाचकर यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. राहुरी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. मिसाळ, गुहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. गणेश आडभाई, संगमनेर पोलिस ठाण्याचे सचिन सोनवणे, उगले तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. शब्बीर मन्सुरी यांच्या नातेवाईक व ग्रामस्थांच्या साक्षीने डीएनए नमुने घेण्यात आले.

काही दिवसांपूर्वी हरवलेल्या व गतिमंद असलेल्या शब्बीर मन्सुरी यांचा मृत्यू झाल्याचे समजून एका अज्ञात मृतदेहाची ओळख त्यांची म्हणून पटविण्यात आली होती. त्यानंतर धार्मिक परंपरेनुसार दफनविधी करण्यात आला. मात्र, काही दिवसांनी शब्बीर मन्सुरी जिवंत घरी परतल्याने संपूर्ण प्रकरण गूढ बनले.

त्यानंतर कब्रस्थानात दफन करण्यात आलेला मृतदेह नेमका कुणाचा? असा प्रश्न निर्माण झाला. त्याचा छडा लावण्यासाठी पोलिस व प्रशासनाने वैज्ञानिक तपासाचा मार्ग स्वीकारला. संकलित केलेले डीएनए नमुने न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहेत.

डीएनए अहवालानंतर मृत व्यक्तीची खरी ओळख स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गूढ प्रकरणावरील पडदा दूर होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या तपास अहवालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Success Story: जुन्नरच्या सिद्धीने गाठले आकाश! अवघ्या २०व्या वर्षी अमेरिकेतून कमर्शियल पायलट बनण्याचा मान, सिद्धी हाडवळेची प्रेरणादायी यशोगाथा.. मृतदेह कोणाचा?

शब्बीर जमादार मन्सुरी (वय ४६, रा. सोनगाव) हे २१ मे २०२६ रोजी घरातून बेपत्ता झाले. नातेवाईकांनी २४ मे २०२६ राहुरी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली. दरम्यान, जोर्वे (ता. संगमनेर) येथे २७ मे २०२६ रोजी एक अनोळखी मृतदेह आढळला. मृत व्यक्तीचे वर्णन हरवलेल्या शब्बीरशी मिळते जुळते आढळले. त्यामुळे नातेवाईकांनी सोनगाव (ता. राहुरी) येथे कब्रस्थानात दफनविधी केला. दरम्यान, वडगाव तांदळी (ता. नगर) येथे शब्बीरने ठोंबरे सर या व्यक्तीस स्वतःचे नाव व पत्ता सांगितला. त्यांनी शब्बीरच्या नातेवाईकांपर्यंत माहिती कळविली. नातेवाईकांनी १८ जून २०२६ रोजी शब्बीरला घरी परत आणले. आता, संगमनेर पोलिसांसमोर मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.