पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात धक्कादायक बाबी समोर येत असून, मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी केवळ लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या करण्याचाच कट रचला नव्हता, तर केतन बचावला तर पुढे काय करायचे याचाही स्वतंत्र 'प्लॅन बी' तयार ठेवला होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
हत्येपूर्वी अनेक पर्यायांवर चर्चापोलीसतपासानुसार, सियाला कोणत्याही परिस्थितीत केतन अग्रवालशी विवाह करायचा नव्हता. त्यासाठी तिने आणि चेतन चौधरीने केतनला संपवण्याच्या विविध मार्गांवर चर्चा केल्याचे तपासात समोर आले आहे. केतनचा अपघात घडवून आणणे किंवा त्याला विष देणे यांसारख्या पर्यायांचाही विचार करण्यात आला होता. मात्र, अशा प्रकारांमध्ये पकडले जाण्याची शक्यता अधिक असल्याने अखेरीस त्याला लोहगड किल्ल्यावरून ढकलण्याची योजना निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
केतन वाचला असता तरी होती वेगळी योजनातपासात आणखी एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, खोल दरीत पडूनही केतनचा जीव वाचला असता, तरी सियाने त्यासाठीही वेगळी योजना आखली होती. एवढ्या उंचीवरून पडल्यामुळे तो गंभीर जखमी होईल किंवा कायमचा अपंग होईल, अशी तिची अपेक्षा होती. अशा परिस्थितीत, त्याच कारणाचा आधार घेत कुटुंबासमोर लग्न मोडण्याचा निर्णय मांडण्याची तिची तयारी होती.
Ketan Agarwal Murder : ११.५ तासांच्या चौकशीत सियाच्या आई-वडिलांनी काय सांगितलं? एकाच खुलाशाने हत्या प्रकरणाला नवं वळण, सियाला तोंडघशी पाडले चेतनशी भविष्यात विवाहाचा कथित विचारसूत्रांच्या दाव्यानुसार, चेतन चौधरीसोबत थेट विवाहाचा प्रस्ताव कुटुंब स्वीकारणार नाही, याची सियाला कल्पना होती. त्यामुळे आधी केतनला मार्गातून दूर करून काही वर्षांनंतर योग्य संधी साधत चेतनशी विवाह करण्याची योजना तिने आखल्याचेही तपासात समोर आले आहे.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात; घटनास्थळी पुनर्रचनासध्या सिया गोयल आणि चेतन चौधरी हे दोघेही पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरू आहे. डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि इतर माहितीच्या आधारे तपास यंत्रणा संपूर्ण कटाचे धागेदोरे जुळवत आहेत. रविवारी सकाळी पोलिसांनी दोन्ही आरोपींना लोहगड किल्ल्यावर नेऊन घटनास्थळाची पुनर्रचना केली. या चौकशीतून आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Ketan Agarwal Murder: केतन हत्याकांडानंतरही सियाचा निर्ढावलेपणा कायम; लॉकअपमध्ये केली अशी मागणी की पोलिसही चकित