Thane Crime: क्लासला जातो सांगून ५ जण घराबाहेर पडले, लखनौला पोहोचल्याचे समजल्या नंतर...; मुंब्य्रात नेमकं काय घडलं?
esakal June 28, 2026 07:45 PM

ठाणे : क्लासला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेल्या तीन विद्यार्थिनी, एक अल्पवयीन मुलगा आणि एक तरुण असे पाच जण बेपत्ता झाल्याची घटना मुंब्य्रात घडली. याप्रकरणी पालकांनी पोलिसात तक्रार दिली आहे. मुंब्रा पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतल्यानंतर ते लखनौला असल्याचे समजले. त्यानुसार तेथे पथक रवाना झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंब्रा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी-विद्यार्थिनी २५ जूनला सायंकाळी क्लासला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले. त्यानंतर ते मित्राच्या कार्यक्रमासाठी वाढदिवसाच्या गेल्याचे समजले; मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. बेपत्ताझालेल्या तीन मुलींमध्ये १५ आणि १७ वर्षीय मुली, एक १३ वर्षीय मुलगा आणि एका २० वर्षाच्या तरुणाचा समावेश आहे.

Mumbai Crime: पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद पेटला, कोयता उपसला अन्...; सीएसएमटीबाहेर थरारक घटना

सर्वजण एकत्र घराबाहेर पडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सर्व जण लखनौला असल्याचे सांगितले. तेथे पथक पाठवले असून त्यांना आणल्यानंतर नेमके कारण समजेल, असे स्पष्ट केले.

Mumbai Local: धक्का लागला, माफी मागितली... तरी आरोपीने केला पाठलाग आणि चाकू हल्ला; मुंबई लोकलनंतर पुन्हा थरार गोमांसासह दोघे ताब्यात, एक फरार

नाकाबंदीदरम्यान वाहन पोलिसांच्या अंगावर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी पहाटे मोखाडा चौफुली येथे घडली. पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर वाहन घाट रस्त्यावर उलटले. यातून गोमांस जप्त करण्यात आले. रिजवान मुबारक अली शेख (२२) आणि इम्तियाज अब्दुल्ला फारुक आईनापूर (३८) यांना ताब्यात घेण्यात आले. तर तौफिक फरार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.