आजचे पंचांग 29 जून 2026! वटपौर्णिमा, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि संपूर्ण दिनविशेष
esakal June 29, 2026 10:45 AM

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀️ सूर्योदय – ०६:०४

☀️ सूर्यास्त – १९:१०

चंद्रोदय – १८:५८

⭐ प्रात: संध्या – ०४:५२ ते ०६:०४

⭐ सायं संध्या – १९:१० ते २०:२२

⭐ अपराण्हकाळ – १३:५५ ते १६:३२

⭐ प्रदोषकाळ – १९:१० ते २१:२०

⭐ निशीथ काळ – ००:१५ ते ००:५८

⭐ राहु काळ – ०७:४२ ते ०९:२०

⭐ यमघंट काळ – १०:५८ ते १२:३७

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त– १५:५३ ते १७:३१

अमृत मुहूर्त– ०६:०४ ते ०७:४२

विजय मुहूर्त— १४:४८ ते १५:४०

⏳ कार्यसिद्धी वेळा – ०९:३३ ते १०:५८ | १३:५५ ते १९:१० | २३:३१ ते २४:००

⚠️ कार्यनाशक वेळा – ०६:०४ ते ०९:३३ | ११:१८ ते १३:५५ | १९:१० ते २३:३१

मुंबई बंदर भरती/ओहोटी – भरती: १९:०५ ते २४:३३ | ओहोटी: २४:३३ ते ३०:०२ | भरती: ३०:०२ ते ३०-०६-२०२६ १२:५८ | ओहोटी: ३०-०६-२०२६ १२:५८ ते ३०-०६-२०२६ १९:५३

ग्रहमुखात आहुती – चंद्र (शुभ)

अग्निवास – पाताळी २९:४८ पर्यंत नंतर पृथ्वीवर

️ शिववास – २९:४८ पर्यंत श्मशानात असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे त्यानंतर गौरीसन्निध असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे

शालिवाहन शक १९४८

संवत्सर पराभव

अयन – उत्तरायण

ऋतु – ग्रीष्म

मास – शुद्ध ज्येष्ठ

पक्ष - शुक्ल पक्ष

तिथी – पौर्णिमा (२९:४८ नं.) प्रतिपदा

वार – सोमवार

नक्षत्र – मूळ (२८:२२ नं.) पूर्वाषाढा

योग – शुक्ल (१४:५१ नं.) ब्रह्मा

करण – भद्रा (१६:४८ नं.) बव

चंद्र रास – धनु

सूर्य रास – मिथुन

गुरु रास – कर्क

दिनविशेष – भद्रा १६.४८ प., स्नानदानासाठी पौर्णिमा,सर्वेषाम्‌ वटसावित्रीव्रतं, वटपौर्णिमा (त्रिदिनात्मक वटसावित्रीव्रत करणाऱ्या स्त्रियांनी चंद्रोदयी चंद्र व अरुंधतीपूजन करून ५ अर्घ्य देऊन पारणे करावे) (चंद्रोदय-१८.५८), पुत्रकामव्रत, बिल्वत्रिरात्रिव्रत, तिलदान केल्यास अश्वमेधयज्ञफल, संत कबीर जयंती, महादबा पाटील पुण्यतिथी, सर्वेषाम्‌ अन्वाधानं, मन्वादि:, कर्नाटक बेंदूर

✅विशेष*प्राचीन काळापासून भारतामध्ये विवाहित स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत भक्तिभावाने करतात.

पिढ्यानुपिढ्या सांगितली जाणारी सावित्री आणि सत्यवानाची कथाही सर्वश्रुत आहे. मात्र त्या कथेमधली सावित्रीची भूमिका, तिचा विद्वत्तापूर्ण दृष्टिकोन आपल्यापर्यंत पुरेसा पोहचलेला दिसत नाही. आज ह्या व्रताचे अनुकरण करताना काही चुकीच्या गोष्टी केल्या जातात. मग मूळ व्रताविषयी सविस्तर माहिती नव्याने जाणून घेतल्यास हे चुकीचे अनुकरण थांबवता येईल का?

व्रताचे योग्य पद्धतीने आचरण करताना शास्त्राला अपेक्षित असणारा अर्थ समजून घेणे आज आवश्यक बनते आहे.

प्रस्तुत व्हिडिओमार्फत पाहूया वटपौर्णिमेचे व्रत नेमके किती दिवसांचे आहे, आणि त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन नेमका काय आहे.

https://youtube.com/watch?v=MC98lZhNTSQ&si=QCIActrveDEv6Lfb

शुभाशुभ दिवस - १६:४८ नं. शुभ दिवस

श्राद्ध तिथी - पौर्णिमा श्राद्ध

आजचे वस्त्र – पांढरे

स्नान विशेष – वाळा, शिरस, केशर, रक्तचंदन यापैकी कोणतेही पाण्यात टाकून स्नान करावे.

उपासना – शिव सहस्रनाम स्तोत्राचे पठण आणि ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा.

दान – सत्पात्री व्यक्तीस तांदूळ, कापूर, मोती, श्वेतवस्त्र, घृताने भरलेला कुंभ दान करावे

तिथीनुसार वर्ज्य – मांस, स्त्रीसंग

दिशाशूल उपाय – दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा करण्यापूर्वी दूध पिऊन बाहेर पडावे.

चंद्रबळ – मेष , मिथुन , कर्क , सिंह , तुळ , वृश्चिक , धनु , कुंभ , मीन — या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.