Baba Vanga Weekly Horoscope 2026: बाबा वेंगाने पुढील आठवडा या राशींसाठी भाग्याचा असल्याचे भाकीत केले आहे. जुलै महिन्यातील 6 ते 12 जूनदरम्यान वृषभ, कन्यासह या राशींचे नशीब चमकेल. या राशींना करिअर, व्यापार, आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात चांगले अनुभव येतील. त्यांच्यासाठी हा आठवडा भाग्याचे दार उघडणार ठरेल. आनंदाच्या सरी बरसतील. तर पैशांची ढगफुटी होईल. पुढील आठवड्यात काय आहेत या राशींचे गुडलक?
वृषभ रास: सासरी मानसन्मान
बाबा वेंगाच्या भाकीतानुसार, येता आठवडा हा वृषभ राशीसाठी नवीन संधी घेऊन येणार आहे. नोकरदार वर्गाला मित्रामार्फत एखाद्या नवीन संधीची माहिती मिळू शकते. नोकरीत बढतीची संधी आहे. नवीन जबाबदारी मिळू शकते. करिअरमध्ये लांब पल्ला गाठाल. व्यापाऱ्यांना मोठा फायदा होईल. सासरकडील मंडळीशी काही वाद सुरू असतील तर ते मिटतील. तुमचा मानसन्मान वाढेल. जोडीदाराची साथ मिळेल. आर्थिक आवक वाढेल. पर्यटनाच्या ठिकाणी जाण्याचा बेत आखाल.
कन्या रास: वाहन खरेदीचा योग
बाबा वेंगानुसार, 6 ते 12 जुलै दरम्यान मेहनतीला फळ मिळेल. नोकरीत मोठी जबाबदारी आणि आर्थिक लाभ मिळतील. नवीन नोकरी चालून येईल. अनेक दिवसांपासून अडलेला वाहन योग पूर्ण होईल. काहींचे घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कन्या राशीला या आठवड्यात सुखद धक्के मिळू शकतात. गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळेल. आई-वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्या. मूळ गावी जाण्याचा आणि जिवलग सवंगड्यांना भेटण्याचा योगही जुळून येऊ शकतो.
तुळ रास: हे जीवन सुंदर आहे
गेल्या काही दिवसांपासून मनावर असलेले मळभ या मुसळधार पावसाने धुवून निघेल. नात्यात, मैत्रित आणि कार्यालयातील सहकाऱ्यांसोबतचा दुरावा कमी होईल. गैरसमज दूर होतील. मैत्रीला बहर येईल. 6 ते 12 जुलै दरम्यान बँक बँलन्स वाढण्याची दाट शक्यता आहे. व्यापारातून चांगला फायदा मिळेल. अडलेले कार्य मार्गी लागेल. कुटुंबातील सदस्यांसोबत आठवडा एकदम चांगला जाईल. हे जीवन सुंदर आहे, असेच गाणं गुणगुणाल.
धनु रास: प्रेमाचा पाऊस
मुसळधार पाऊस, गरमागरम भज्जी आणि चहा, मक्याचं कणीस आणि तिची साथ असं संकेत ग्रहमान देत आहेत. हा आठवडा रोमँटिक असेल. 6 ते 12 जुलै या दरम्यान धनु राशीच्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा प्रेमात पडावसं वाटेल. प्रेमात बुडाल. पत्नीशी सूर जुळतील. नवीन संधी गवसेल. त्यामुळे जीवनाला चार चांद लागल्यासारखे होईल. एखादी धार्मिक यात्रा होऊ शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ग्रह तुमच्या पाठीमागे खंबीर उभे ठाकले आहेत. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळू शकतात.
कुंभ रास: या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे गीत ऐकलंय का? मग नक्की ऐका. अशीच काहीशी या आठवड्यातील तुमची अवस्था असेल. कुंभ राशीला 6 ते 12 जुलै हा आठवडा आनंददायी ठरेल. गेल्या अनेक दिवसांचे स्वप्न सत्यता उतरण्याचे संकेत मिळतील. करिअरमध्ये नवीन संधी मिळेल. कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्यांना कायमची नोकरी मिळेल. थांबलेली कामे दुडुदुडु धावतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. जुना मित्र मदतीला धावेल. हा आठवडा एकदम सकारात्मक असेल. बाहेरचा पाऊस जणू तुमच्या मनात बरसेल.
(डिस्क्लेमर : बाबा वेंगा यांची भविष्यवाणी ही केवळ माहिती म्हणून देण्यात येत आहे. टीव्ही ९ मराठी त्याविषयी कोणताही दावा करत नाही.)