Uddhav Thackeray: राजकारणात वाईट काळ असला की नवे नवे राजकारणात आलेलेही भल्याभल्यांना सल्ले देऊ लागतात. असाच सल्ला शिंदेसेनेचे नवनिर्वाचित आमदार सईद खान यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
Mamata Banerjee: ममता बॅनर्जींना सर्वोच्च झटका! तृणमूलच्या आणखी एका बड्या नेत्यानं सोडली साथ"उद्धव ठाकरे यांना 19 खासदार आणि 40 आमदार गेल्या अडीच तीन वर्षात सोडून गेले आहेत. कार्यकर्त्यांशी संपर्क न ठेवल्यामुळं आणि नेते पदाधिकाऱ्यांना वेळ न दिल्यामुळं अख्खा पक्ष संपत आला आहे," अशी टीका करतानाच सईद खान यांनी उद्धव ठाकरे यांनी आता तरी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला दिला आहे.
Siya Goyal: सिया गोयल प्रकरणात ट्विस्ट! माध्यमांसमोर बोट दाखवल्याच्या वादावर कुटुंबियांचा मोठा खुलासाकोणताही राजकीय पक्ष घरात बसून चालत नसतो. आमचे नेते एकनाथ शिंदे हे 24 तास जनतेमध्ये जाऊन काम करतात. उद्धव ठाकरे मात्र ते मुख्यमंत्री असतानाच्या काळात कधी मंत्रालयातही आले नाहीत. पक्ष संघटना घरात बसून वाढत नसते. नायक चित्रपटातील मुख्यमंत्री असलेल्या अनिल कपूर सारखे एकनाथ शिंदे यांचं काम आहे. म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाखाली जनतेची विकास कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्वच पक्षातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी शिवसेनेत दाखल होत आहेत. शिवसेनेत उठाव झाल्यानंतर शिंदेसाहेबांसोबत 40 पेक्षा जास्त आमदार आले होते.
Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराच्या दानचोरीचा मुद्दा पोहोचला सुप्रीम कोर्टात; CBIची पण होणार एन्ट्री? घोटाळ्याची पाळमुळं खोलवर१३ खासदारांनीही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याला पसंती दिली होती. आता पुन्हा सहा खासदार शिवसेनेत दाखल झाल्याने आमच्याकडे असलेल्या खासदारांची संख्या वाढली आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष सोडून जाणाऱ्यांची संख्या येत्या महिनाभरात अजून वाढणार आहे. 14 आमदार लवकरच ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत येतील असा दावाही सईद खान यांनी केला.
Salil Deshmukh: अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांवर शरद पवारांनी सोपवली मोठी जबाबदारी; नागपूरमध्ये मोठे संघटनात्मक बदलयाशिवाय राज्यभरातून अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक आहेत. उद्धव ठाकरे यांनी आता तरी यातून धडा घ्यावा, आत्मपरीक्षण करावं याचा पुनरुच्चार खान यांनी केला. एकनाथ शिंदे हे सर्वमान्य नेते असून ते कायम लोकांमध्ये असतात आणि म्हणूनच त्यांच्यावर महाराष्ट्रातील जनता प्रेम करते असेही सईद खान यांनी म्हटलं आहे.