डोंबिवलीच्या कचेरी गावात दुकानातून सामान घेऊन घरी परत येताना महिलेचा पाय घसरून ट्रान्सफार्मर जवळ पडून विजेचा धक्का बसला. स्थानिकांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले मात्र तिथे तिला मृत घोषित केले.
ALSO READ: ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये एक खाजगी पर्यटक बस जळून खाक
सदर घटना 1 जुलैच्या रात्रीची डोंबिवलीतील कचेरी गावातील आहे. शशी राहुल चक्र नावाची महिला दररोजच्या गरजेची वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानावर गेली. सामान परत घेऊन येताना निसरड्या रस्त्यावर पाय घसरून ट्रान्सफार्मर जवळ पडली. दरम्यान, तिचा विजेच्या तारेला स्पर्श झाला आणि तिला विजेचा जोरदार धक्का बसला.
ALSO READ: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
जवळच्या लोकांनी तात्काळ त्या महिलेला मदत केली. स्थानिकांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले परंतु लोकांनी तातडीने तिला मदत केली आणि तिला रुग्णालयात दाखल केले असून मृत घोषित केले. प्राथमिक तपासात विजेचा धक्का लागून तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस या घटनेचा संपूर्ण तपास करत आहे.Edited By - Priya Dixit
ALSO READ: शनिवारी मुंबई आणि ठाण्यासह चार शहरांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी