Maharashtra Politics Live Update : मुंबई, पुण्यासह राज्यभरात पावसाची जोरदार हजेरी; हवामान विभागाचा 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट
Sarkarnama July 05, 2026 11:45 AM
लोहगड किल्ला प्रकरणात मृत्यू झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांचे निधन

लोहगड किल्ला प्रकरणात मृत्यू झालेल्या केतन अग्रवालचे आजोबा देवीचंद किसनलाल अग्रवाल यांचं वयाच्या ७१ व्या वर्षी दुःखद निधन झालं आहे.नातवाच्या हत्येच्या धक्क्यातून ते सावरले नव्हते. त्यामुळे त्याच्या विरहातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

मुंबई, पुण्यासह राज्यभरात पावसाची जोरदार हजेरी; हवामान विभागाचा 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अशातच हवामान खात्याने आजपासून पुढील दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे गरज असेल तरच नागरिकांना घराबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा दिला आहे. यामध्ये सातारा आणि पुण्याचाही समावेश आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.