रविवारी (५ जुलै) ऑस्ट्रेलिया महिला संघाने महिला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला ७ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलिया महिला संघाने सातव्यांदा महिला टी२० वर्ल्ड कप विजेतेपद जिंकले. ऑस्ट्रेलियाच्या विजयात बेथ मुनीने मोलाचा वाटा उचलला. या संपूर्ण स्पर्धेत ऑस्ट्रेलिया अपराजित राहिले.
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलिया ७ व्यांदा विजेते! आजवर कधी अन् कोणत्या देशाने जिंकली ट्रॉफी? जगज्जेत्या कर्णधारांचीही पाहा यादीया सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार नतालिया सायव्हर-ब्रंट (नाबाद ५८) आणि फ्रेय केम्प (नाबाद ४४) यांच्या खेळीच्या जोरावर २० षटकात ४ बाद १५० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार सोफी मोलिनेक्स, ऍनाबेल सदरलँड्स, किम गार्थ आणि ल्युसी हेमिल्टन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
त्यानंतर १५१ धावांचे लक्ष्याचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने १७.१ षटकात ३ विकेट्स गमावत १५३ धावा करत पूर्ण केला. ऑस्ट्रेलियाकडून बेथ मुनीने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली, तर फोबी लिचफिल्डने ४८ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून लॉरेन बेल, शारलोट डीन आणि सोफी इक्लेस्टोन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
दरम्यान, यंदाच्या या स्पर्धेसाठी आयसीसीने बक्षीसाची रक्कम १० टक्क्याने वाढवली होती. त्यामुळे यंदा विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला २३,४०,००० अमेरिकन डॉलर म्हणजेच साधारण २२.२ कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच उपविजेत्या इंग्लंड संघाला ११,७०,००० अमेरिकन डॉलर म्हणजेच ११.१ कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका संघाला ३१,१५४ अमेरिकन डॉलर (साधारण २९ लाख) मिळाले.
Women's T20 World Cup वर ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व! इंग्लंडला फायनलमध्ये पराभूत करत तब्बल सातव्यांचा 'चॅम्पियन'या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी झाले होते. पण भारतीय संघासह बांग्लादेश, पाकिस्तान, नेदरलँड्स, श्रीलंका, न्यूझीलंड, स्कॉटलंड आणि आयर्लंड या संघांचे आव्हान साखळी फेरीतच संपले होते.