शिंदे सेनेच्या ऑपरेशन टायगरमुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालंय. अशातच खासदार राऊतांनी आणखी एक मोठं विधान केलंय. मविआच्या आमदाराला शिंदेसेनेची 20 कोटींची ऑफर आल्याचा दावा केलाय. विरोधी पक्षातील कोणत्या आमदाराला ऑफर आली आहे ? या आमदाराने काय प्रतिक्रीया दिली आहे? पाहूया एक रिपोर्ट.
हिंदूंना लुटणारं सरकार सत्तेत; रामाचं धनुष्य चोरणाऱ्यांची लंका 'मशाली'नं जाळणार, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोलठाकरे सेनेचे सहा खासदार फुटल्याचा धक्का ताजा असताना आमदार सचिन अहिरांनी ठाकरेंची साथ सोडल्याने राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. एकीकडे शिंदेसेनेचं राज्यातील राजकीय वजन वाढलेलं असताना विरोधकांनीही फोडाफोडीच्या राजकारणाची धास्ती घेतली आहे. अशा स्थितीतच खासदार संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे.
खासदार अमोल कोल्हेंना कुणाची ऑफर? ठाकरेंनंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदारही फुटणार?महाविकास आघाडीचे आमदार धीरज लिंगाडे यांना शिंदेसेनेकडून 20 कोटींची ऑफर आल्याचं म्हटलंय. लिंगाडे हे विधान परिषदेत अमरावती पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांनी राऊतांचा दावा फेटाळून लावला आहे.
मविआचा आमदार शिंदेंच्या संपर्कात?राऊतांच्या या दाव्यावर सत्ताधाऱ्यांनी टिका केली आहे. राऊत मनात येईल ते आकडे सांगतात, असं म्हणत भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी टोला लगावला आहे. विधान परीषद निवडणुकीत मविआला एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेसच्या काही उमेदवारांनी तर ऐनवेळी माघार घेऊन पक्षाला तोंडघशी पाडलंय. याच पार्श्वभूमिवर बोलावलेल्या मविआच्या बैठकीला २३ आमदार गैरहजर होते.
एकीकडे फोडाफोडीच्या राजकारणाला उत आलेला असताना महाविकास आघाडीची एकी दिसत नाही. हे वास्तव आहे. उद्धव ठाकरेंनीही तिन्ही पक्षांच्या एकीची गरज व्यक्त केली आहे. भविष्यात ऑपरेशन टायगरमधून कोणावर नेम साधला जाणार ? विरोधी पक्षाचे आमदार पक्षाशी एकनिष्ठ राहणार का की सत्तेच्या वळचणीला जाणार? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.