Mahabaleshwar Rain Update : महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस! 24 तासांत 513 मिमी अतिवृष्टी; कोयना धरणात 78,000 क्युसेक वेगाने आवक, मोरणा धरण ओव्हरफ्लो
esakal July 06, 2026 03:45 PM

सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी खबरदारीचा उपाय म्हणून महाबळेश्वर (Mahabaleshwar 513 mm rainfall today), पाटण, जावळी, वाई आणि सातारा या पाच तालुक्यांतील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सोमवार (ता. ६) रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत तब्बल ५१३.० मिमी पावसाची नोंद झाली असून हा अतिवृष्टीच्या श्रेणीतील पाऊस आहे. भारतीय हवामान विभागाच्या महाबळेश्वर वेधशाळेच्या उपलब्ध नोंदीनुसार १९०३ पासूनच्या इतिहासात २४ तासांतील ही सर्वाधिक पर्जन्यवृष्टी ठरली आहे. यापूर्वी २२ जुलै २०२१ रोजी ५९४.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. महाबळेश्वर येथे किमान तापमान १८.४ अंश सेल्सिअस, आर्द्रता १०० टक्के असून हंगामातील एकूण पर्जन्यमान १,७१७.४ मिमीवर पोहोचले आहे. सततच्या पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Pune Mumbai Train Update : लोणावळ्याजवळ मंकी हिल, ठाकूरवाडी घाटात दरड कोसळली; पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत, कोयना एक्सप्रेस तब्बल 3 तास उशिराने धावणार

सातारा शहरातही पावसाचा जोर कायम असून गेल्या २४ तासांत ५५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरातील किमान तापमान २१.९ अंश सेल्सिअस, आर्द्रता ९५ टक्के असून हंगामातील एकूण पर्जन्यमान २१४.६ मिमी झाले आहे. दिवसभर रिमझिम पावसासह जोरदार वारेही वाहत आहेत.

कोयना धरणात पाण्याची वेगवान आवक

सततच्या पावसामुळे कोयना धरणातील पाण्याची आवक झपाट्याने वाढत आहे. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत धरणाची पाणीपातळी ६३१.५४६ मीटर (२०७२ फूट) झाली असून धरणात २२.५४ टीएमसी म्हणजेच २२.५१ टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणात सध्या ७८,३२२ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असली तरी अद्याप धरणातून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.

मोरणा धरणातून ३,२५३ क्युसेक विसर्ग

मोरणा धरण परिसरातही मुसळधार पाऊस सुरू असून गेल्या २४ तासांत २९४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा ६९.४२ टक्क्यांवर पोहोचला आहे. सांडव्यावरून ३,०८० क्युसेक आणि सिंचन व विद्युत विमोचकातून १७३ क्युसेक असा एकूण ३,२५३ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

Kolhapur Flood Alert : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार सुरूच! पंचगंगा पात्राबाहेर, पाणीपातळी 32 फुटांवर; 42 बंधारे, 14 मार्ग बंद केळघर घाटात दरड कोसळली

मेढा–महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटातील काळा खडक परिसरात दरड कोसळल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरू केले. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद

जिल्ह्यातील विविध भागांमध्ये झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे आहे -

  • जोर – ५४७ मिमी

  • सोनत – ३७३ मिमी

  • सांडवली – ३०५ मिमी

  • कास – ३०३ मिमी

  • मोरणा धरण – २९४ मिमी

  • नवजा – २६६ मिमी

  • कोयनानगर – २५८ मिमी

  • धोम-बळकवडी – २४९ मिमी

  • धोम – २०४ मिमी

  • ठोसेघर – १९६ मिमी

  • बामणोली – १९५ मिमी

  • रांजणी – १९३ मिमी

  • मेढा – १६९ मिमी

  • तारळी – १०९ मिमी

  • उरमोडी – १०० मिमी

  • नागेवाडी – ९६ मिमी

  • परळी – ९६ मिमी

  • माळेवाडी – ८० मिमी

  • बेलवडे – ५८ मिमी

  • येळगाव – ५८ मिमी

  • वाठार स्टेशन – ५२ मिमी

  • चाफळ – ५० मिमी

Koyna Dam Update : कोयना, महाबळेश्वर, नवजाला पावसाने झोडपले! धरणाचा पाणीसाठा 27 TMC पार, पाहा ताजी आकडेवारी, पाणीसाठ्यात रेकॉर्डब्रेक वाढ प्रमुख धरणांतील पाण्याची आवक

जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये पाण्याची आवक पुढीलप्रमाणे सुरू आहे -

  • कोयना धरण – ७८,३२२ क्युसेक

  • कण्हेर धरण – १३,५७५ क्युसेक

  • धोम धरण – ११,०८७ क्युसेक

  • धोम-बळकवडी धरण – ७,१५७ क्युसेक

  • उरमोडी धरण – ४,८७३ क्युसेक

  • तारळी धरण – ३,९५० क्युसेक

  • मध्यम प्रकल्पांतील आवक

  • मोरणा धरण – ३,९०३ क्युसेक

  • उरमोडी (लघु) – ३२७ क्युसेक

  • वांग – १६५ क्युसेक

  • महू – ८७ क्युसेक

प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन

कोयना धरणात सर्वाधिक ७८,३२२ क्युसेक पाण्याची आवक सुरू असली तरी सध्या धरणातून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. मात्र, मोरणा धरणातून ३,२५३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मोरणा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदी-नाल्यांमध्ये उतरू नये, पूरग्रस्त भागात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.