पावसाळा स्पेशल भजी
Marathi July 06, 2026 05:25 PM

पावसाळा म्हटल की गरमागरम चहा आणि कुरकुरीत भजी आलीच . पण जर तुम्हाला नेहमीच्या कांदा-बटाटा भजींपेक्षा वेगळी भजी ट्राय करायची असतील तर आमच्या वाचकांसाठी घरच्या घरी सहज बनवता येतील अशा काही वेगळ्या आणि चविष्ट पावसाळी भजींच्या रेसिपी देत आहेत.

१. रानभाजीची भजी- पावसाळ्यात बाजारात मिळणाऱ्या रानभाज्या

साहित्य:

२ कप चिरलेली रानभाजी
1 कप बेसन
२ टेबलस्पून तांदळाचे पीठ
हळद, तिखट, ओवा, जिरे, मीठ
कोथिंबीर
तळण्यासाठी तेल

कृती:

सर्व साहित्य एकत्र करून थोडे पाणी घालून घट्ट पीठ तयार करा. गरम तेलात छोटे-छोटे भजी सोडून सोनेरी होईपर्यंत तळा.
—————————————————————————————
२. मक्याची भजी

साहित्य:

१ कप उकडलेले मक्याचे दाणे
1 कप बेसन
हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट
कोथिंबीर, मीठ, तिखट
तेल

कृती:

सर्व साहित्य मिसळून घट्ट मिश्रण तयार करा. चमच्याने तेलात सोडून कुरकुरीत तळा.
——————————————————————————-
३. कांदा-पालक भजी

साहित्य:

२ कांदे (पातळ चिरलेले)
१ कप चिरलेला पालक
1 कप बेसन
तांदळाचे पीठ
हिरवी मिरची, मीठ, ओवा

कृती:

सर्व साहित्य हाताने मळून मिश्रण तयार करा. आवश्यक असल्यास थोडेच पाणी घाला. गरम तेलात तळा.
——————————————————
४. बटाटा-चीज भजी

साहित्य:

बटाट्याच्या गोल चकत्या
किसलेले चीज
बेसन
मीठ, तिखट, हळद

कृती:

दोन बटाट्यांच्या चकत्यांमध्ये चीज भरून बेसनाच्या पिठात बुडवा आणि तळा.
———————————————————————————
५. मशरूम भजी

साहित्य:

२०० ग्रॅम मशरूम
बेसन
तांदळाचे पीठ
काळी मिरी, मीठ, लाल तिखट
तेल

कृती:

मशरूम स्वच्छ करून मसाले घातलेल्या बेसनात बुडवा आणि कुरकुरीत तळा.
——————————————————————————
6. पनीर भजी

साहित्य:

पनीरचे चौकोनी तुकडे
बेसन
आले-लसूण पेस्ट
तिखट, हळद, मीठ
तेल

कृती:

पनीरचे तुकडे बेसनाच्या मिश्रणात बुडवून सोनेरी होईपर्यंत तळा.
——————————————————————————
७. कोबी-गाजर भजी

साहित्य:

१ कप किसलेला कोबी
½ कप किसलेले गाजर
बेसन
हिरवी मिरची, कोथिंबीर
मीठ, ओवा

कृती:

सर्व साहित्य मिसळून छोटे भजी तळा.
——————————————————————
८. मिक्स व्हेज क्रिस्पी भजी

साहित्य:

कांदे, बटाटे, पालक, कोबी, मका
बेसन
तांदळाचे पीठ
लाल तिखट, हळद, मीठ, ओवा

कृती:

सर्व भाज्या आणि मसाले मिसळून कुरकुरीत भजी तयार करा.

भजी अधिक कुरकुरीत होण्यासाठी टिप्स
बेसनात २–३ चमचे तांदळाचे पीठ किंवा रवा घाला.
पीठ जास्त पातळ करू नका.
तेल मध्यम ते गरम असावे.
भजी तळल्यानंतर टिश्यू पेपरवर काढा.

गरम चहा, हिरवी चटणी, लसूण चटणी किंवा चिंच-गुळाची गोड-तिखट चटणीसोबत ही भजी छान लागतात.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.