Retired IAS officer son : लग्नासाठी नकार दिला म्हणून एका निवृत्त महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या लेकाने ३८ वर्षीय महिलेला बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या मारहाणीत पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
देवाशिष निगम असे या आरोपीचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ४) कानपूरमध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आयआयटी कानपूरमध्ये नोकरीस आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास निगम याने या महिलेला कामाच्या ठिकाणाहून कारमध्ये घेतले. तिथून रस्त्याने जात असतानाच दोघांमध्ये लग्नावरून वाद झाले.
निगम याच्याकडून लग्नासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप संबंधित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे. लग्नास नकार दिल्यानंतर त्याने मारहाण केली. भररस्त्यात कार उभी करून बाहेर काढले. रस्त्याच्या कडेला पडलेली वीट उचलून त्याने महिलेला मारहाण करण्यास सुरूवात केली.
Priyanka Chaturvedi news : प्रियांका चतुर्वेदींचा राजकारणातून संन्यास? भाजप खासदाराच्या संस्थेत नवी सुरूवात करताच चर्चांना उधाण, थेट उत्तर दिलं...घाबरलेल्या महिलेने बचावासाठी स्वत:ला कारमध्ये कोंडून घेतले. पण आरोपीने विटेने कारची काच फोडत दार उघडले, असे पोलिसांनी सांगितले. महिलेला कारमधून बाहेर ओढल्यानंतर निगम याने पुन्हा मारहाण सुरू केली. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. स्थानिकांनी निगम याला ताब्यात घेऊन पोलिसांकडे सोपविले.
IPS Abhijeet Patil news : मराठमोळ्या IPS अधिकाऱ्याची धडाकेबाज कामगिरी; बिश्नोई गँगसह अन्य टोळ्यांना आणलं वठणीवर...स्थानिकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला. पोलिस आल्यानंतर त्याने आपण निवृत्त आयएएस अधिकारी असल्याचे सांगत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. पोलिस तपास निगम याचे आधीच लग्न झाले असून त्याला एक मुलगीही आहे. तर पीडित महिला विधवा असून तिलाही एक मुलगी आहे.