'फ्रान्सचा संघ, 11 खेळाडू... 10 काळे... 1 गोरा?'; FIFAच्या संघावर अमिताभ बच्चन यांची वर्णद्वेषी टिप्पणी; उफाळला वाद, नेटकरी भडकले
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क July 07, 2026 05:13 PM

Amitabh Bachchan On French Football Team: सध्या फिफा (FIFA 2026) फिवर सुरू आहे. सध्या फिफा विश्वचषक (FIFA World Cup 2026) ऐन रंगात आलाय. यंदाच्या फिफामध्ये अगदी छोट्या देशांनी धुमाकूळ घातलाय आणि दिग्गजांना लोळवलंय. रोनाल्डोची (Cristiano Ronaldo) पोर्तुगाल (Portugal), फिफामध्ये कित्येक वर्ष ऐतिहासिक कामगिरी करणारा ब्राझीलही (Brazil) यावेळी विश्वचषक स्पर्धेतून बाहेर गेलाय. एकीकडे रंगात आलेला फिफा विश्वचषक रंगात आली असताना, दुसरीकडे फ्रान्सच्या फुटबॉल संघावर (France Football Team) वक्तव्य केल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. फ्रान्सच्या फुटबॉल संघाबाबत एक ट्वीट केल्यामुळे अमिताभ बच्चन नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलेत.  

फ्रान्सच्या फिफा विश्वचषक 2026 (FIFA World Cup 2026) संघाबाबत केलेल्या एका ट्विटमुळे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. संघातील खेळाडूंच्या वर्णावरुन त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी झोडून काढलंय. अनेकांनी अमिताभ बच्चन यांनी केलेली टिप्पणी उघडपणे वर्णद्वेषी असल्याचं म्हटलंय. हे ट्वीट प्रचंड व्हायरल झालं असून त्यावरुन सोशल मीडियावर प्रचंड गदारोळ सुरू झालाय. 

आपल्या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी लिहिलंय की, "T 5794 - चला स्पष्टच बोलूयात, फ्रान्सचा विश्वचषक 2026 फुटबॉल संघ... फ्रान्सचा संघ!! संघात 11 खेळाडू... 10 कृष्णवर्णीय...!! 1 गोरा!!? कृष्णवर्णीयांची ताकद (POWER of BLACK)..." अमिताभ बच्चन यांचं हे ट्वीट काही मिनिटांतच मोठ्या प्रमाणावर शेअर केलं गेलं आणि लवकरच ट्विटरवर सर्वाधिक चर्चेत असलेल्या विषयांपैकी एक बनलं. 

अमिताभ बच्चन यांच्यावर चौफेर टीका (Amitabh Bachchan Tweet On French Football Team)

अनेक युजर्सनी बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्यावर आरोप केलाय की, त्यांनी फ्रान्सच्या नॅशनल टीमची ओळख, खेळाडूंच्या स्किन कलरपर्यंतच मर्यादीत ठेवंलीय. टीकेची झोड उठवत नेटकरी म्हणालेत की, फुटबॉलपटूंची ओळख त्यांच्या वंशावरुन नव्हे, तर त्यांच्या राष्ट्रीयत्वावरून केली जावी. अनेकांनी अमिताभ बच्चन यांची पोस्ट असंवेदनशील आणि अनावश्यक असल्याचं म्हटलंय.

नेटकऱ्यांनी सांगितलं फॅक्ट 

काही लोकांचं म्हणणं आहे की, फ्रान्स कित्येक वर्षांपासून वेगवेगळ्या जातीतल्या आणि वंशाच्या खेळाडूंचा समावेश असलेला एक मल्टीकल्चरल देश आहे. त्यांचं म्हणणं आहे की, संघातील अनेक खेळाडू आफ्रिकन किंवा कॅरिबियन वंशाचे असले, तरी त्यांचा जन्म आणि पालनपोषण फ्रान्समध्येच झालंय. अमिताभ यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय आणि खेळाडूंच्या ओळखीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय, असं युजर्सचं म्हणणं आहे.

फ्रान्सच्या फुटबॉल टीमचा जुना वाद काय? 

अमिताभ बच्चन यांच्या ट्वीटनंतर फ्रान्सच्या नॅशनल फुटबॉल टीमशी जोडलेला एक जुना वाद पुन्हा एकदा उफाळून आली आहे. कारण मोठ्या स्पर्धांदरम्यान या संघातील वांशिक विविधतेबाबत वारंवार चर्चा केली जाते. काहींनी अमिताभ बच्चन यांचा बचाव करत असा युक्तिवाद केला की, ते केवळ एक वस्तुस्थिती मांडत होते, तर अनेकांना त्यांचे शब्द अयोग्य वाटले. 

दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, अमिताभ सध्या 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) या पौराणिक-विज्ञानकथा (Mythological Sci-Fi) प्रकारातील ब्लॉकबस्टर सिनेमाच्या आगामी सिक्वेलमध्ये 'अश्वत्थामा' ही आपली अत्यंत गाजलेली भूमिका पुन्हा साकारण्याच्या तयारीत आहेत. नाग अश्विन दिग्दर्शित या चित्रपटात ते प्रभास आणि कमल हासन या सहकलाकारांसोबत पुन्हा एकदा काम करताना दिसतील. मात्र, या सिनेमाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Alpha Review: स्पाय युनिव्हर्सचा अपमान करणारा आलिया भटचा 'अल्फा'; ना दमदार कथा, ना अॅक्शन अन् ना अभिनय

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.