इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध जवळपास तीन महिन्यांनी थांबले. या युद्धामुळे जग मोठ्या संकटात होते. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढताना दिसल्या. जगाच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम झाला. यादरम्यानच आता मोठी खळबळ उडाली. एका अमेरिकन अधिकाऱ्याचा हवाला देणाऱ्या अहवालानुसार, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या दोन व्यापारी जहाजांवर किमान क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्याने पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली. या हल्ल्यात दोन्ही जहाजांचे मोठे नुकसान झाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील हल्ले थांबवण्याबाबत अमेरिका आणि इराण यांच्यात यापूर्वीच एक करार झाला होता.
पण पुन्हा एकदा होर्मुज खाडी तणाव वाढला आहे. इराण आणि अमेरिका युद्ध शांत झालेले असतानाच पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडीच युद्धाचे मैदान बनले होते. तिथे मोठे हल्ले केले जात होते. होर्मुज खाडी सर्वांसाठी बंद करण्यात आली होती. तिथून जाणाऱ्या जहाजावर हल्ले केले जात होते. भारताच्याही जहाजावर हल्ले करण्यात आली.
अमेरिका आणि इराण यांच्यातील तात्पुरत्या कराराचा संदर्भ देत डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केली. त्यांनी म्हटले की, अमेरिकेने इराणला अंत्यसंस्कारासाठी एक आठवड्याची सवलत दिली होती, कारण आम्ही चांगले आहोत. ट्रम्प यांचा रोख इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या शासकीय अंत्यसंस्काराकडे होता. युद्धाच्या सुरुवातीच्या काळात अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात खामेनी मारले गेले होते.
28 फेब्रुवारी रोजी पहिला मोठा हल्ला अमेरिकेने इराणवर केला. ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. इराणने त्यानंतर तात्काळ ज्या ज्या आखाती देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, अशा ठिकाणी हल्ले केले. स्थिती अधिक गंभीर बनली. अखेर दोन्ही देशात युद्धविराम झाले. इराणने होर्मुज खाडी बंद केल्याने अमेरिकेवर जगाचा मोठा दबाव होता. मात्र, आता पुन्हा एकदा होर्मुज खाडीत तणाव वाढला आहे.
ब्रिटीश लष्कराच्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे ओमानच्या किनारपट्टीजवळील स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून जाणाऱ्या एका तेल टँकरवर एका प्रक्षेपकाचा मारा झाला. त्यानंतर या टँकरला आग लागली. मात्र, यात जीवितहानी झाल्याचे कोणतेही तात्काळ वृत्त नाही. यूके मॅरिटाइम ट्रेड ऑपरेशन्सने दिलेल्या माहितीनुसार, ओमानमधील लिमाह किनारपट्टीजवळ या तेल टँकरवर हल्ला झाला.