England vs India, 3rd T20I Marathi Update News : भारतीय संघाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा शरणागती पत्करलेली दिसली. इंग्लंडच्या २०१ धावांचा पाठलाग करताना भारताने पहिल्या ५ षटकांत पाच विकेट्स गमावल्या. अभिषेक शर्मा दुसऱ्या षटकात माघारी परतल्यानंतर पुढील २० चेंडूंत भारताचा निम्मा संघ तंबूत परतला होता. ट्वेंटी-२० क्रिकेटच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच पॉवर प्लेमध्ये पाच विकेट्स गमावल्या... १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची विकेट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठऱली.
फिल सॉल्ट, जॉस बटलर व सॅम कुरन यांच्या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने ७ बाद २०१ धावांचा डोंगर उभा केला. बटलरने २१ चेंडूंत ३६ धावा करताना इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिलेली, परंतु प्रिंस यादवने त्याच्या पहिल्या दोन षटकांत दोन विकेट्स घेत भारताला पुनरागमन करून दिले. हर्षित राणाने सलग दोन विकेट्स घेऊन इंग्लंडची मधळी फळी अपयशी ठरवली, पण, सॉल्ट अन् कुरन ही जोडी मैदानावर उभी राहिली. सॉल्टने ४४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७० धावा केल्या, तर कुरन २४ चेंडूंत ४१ धावांवर नाबाद राहिला.
Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवलीइंग्लंडला पॉवर प्लेमध्ये ८.१६ च्या सरासरीने ४९ धावा करता आल्या होत्या, परंतु ७ ते १५ षटकांत १०.४४ आणि १६ ते २० षटकांत ११. ६ च्या सरासरीने फटकेबाजी करून त्यांनी तगडे लक्ष्य उभे केले. इंग्लंडने ट्वेंटी-२०त भारताविरुद्ध चौथ्यांदा २०० हून अधिक धावांचा टप्पा ओलांडला आणि आजची धावसंख्या ही त्यांची तिसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली.
लक्ष्याचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने षटकाराने त्याचे खाते उघडले, त्याला पाहून अभिषेक शर्मानेही फुलटॉसवर षटकार खेचला. वैभवने त्याचा हिसका दाखवताना पुन्हा एकदा चेंडू प्रेक्षकांमध्ये पाठवला. पण, जॉश टंगने त्याच षटकात अभिषेकला ( १०) झेलबाद केले.
जोफ्रा आर्चरच्या बाऊन्सरवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात वैभवही ( १३) झेलबाद झाला. यष्टीरक्षक जॉस बटलरने सोपा झेल टिपला. त्यानंतर इशान किशन ( १३) टंगचा दुसरा शिकार ठरला. आर्चरने भन्नाट मारा करताना कर्णधार श्रेयस अय्यर ( ५) व अक्षर पटेल ( १०) यांना बाद करून भारताची अवस्था ५ बाद ५२ अशी दयनीय केली.