खडकवासला धरण तुडुंब भरलं, मध्यरात्रीच्या अंधारात दरवाजे उघडले, पुण्यात हायअलर्ट
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे July 08, 2026 10:13 AM

माळीण फाट्यावर दरड कोसळली, आहुपेकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. आंबेगाव तालुक्यातील माळीण परिसरात मुसळधार पावसामुळे  दरड कोसळण्याची घटना घडली आहे. माळीण फाट्याजवळ रस्त्यालगतचा डोंगरकडा कोसळल्याने आहुपेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय या मार्गावर प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Lonavala Heavy Rain: लोणावळ्यात 48 तासांत 1115 मिमी पाऊस

लोणावळा शहरात गेल्या 48 तासांत 1115 मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. जुना खंडाळा परिसरातील रस्टिक हायलँड येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळली होती. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार महाराष्ट्रातील बहुतांश भागात 8 जुलैपासून पावसाचा जोर ओसरणार आहे. पुढील 10 दिवस अनेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. त्यामुळे तापमान वाढण्याचाही अंदाज आहे.

काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.