सुशांत सिंह राजपूतमुळे चिडलेला MS धोनी; अभिनेतााच्या 'त्या' एका कृतीनं 'कॅप्टन कूल'चा सुटलेला संयम, नेमकं काय घडलेलं?
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क July 08, 2026 10:13 AM

Sushant Singh Rajput Make MS Dhoni Angry: 'कॅप्टन कूल' (Captain Cool) म्हणून प्रसिद्ध असलेला महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आजही लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. धोनीनं क्रिकेटच्या तिनही फॉर्ममधून निवृत्ती घेतली असली तरी तो अजूनही आयपीएल (IPL) खेळतोय, आयपीएलच्या मैदानात धोनी कधी उतरतो आणि त्याच्या बॅटनं सिक्सर मारतो, याची चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात. धोनीला त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखलं जातो, पण कधी हाच धोनी चिडला तर काय होतं? यावर दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Late Bollywood Actor Sushant Singh Rajput) यानं एक किस्सा सांगितलेला. 

सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) 'एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी' (M.S. Dhoni: The Untold Story) सिनेमा खूप गाजलेला. धोनीच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा खूपच खास होता, पण सुशांतनं यात साकारलेली भूमिका इतकी उत्कृष्ट होती की, त्याच्या स्वतःच्या कारकिर्दीतीलही तो एक अविस्मरणीय सिनेमा ठरला. महेंद्रसिंह धोनीचं पात्र जिवंत करण्यासाठी सुशांत सिंह राजपूतनं प्रचंड मेहनत घेतली होती. दोघांच्या शारीरिक रचनेत साम्य नसतानाही, प्रेक्षकांनी पडद्यावरील त्या व्यक्तिरेखेला सहजपणे धोनी म्हणूनच स्वीकारलं. धोनीसारखा लूक मिळवण्यासाठी सुशांतनं केवळ शारीरिक बदलच केले नाहीत, तर त्याची देहबोली आणि शैलीही हुबेहूब आत्मसात केलेली, त्याच्या या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. पण, धोनीला हुबेहुब आत्मसात करणं सुशांतसाठी सोपं नव्हतं, त्यासाठी वेळीच त्यानं धोनीचा संतापही पाहिलेला. 

Prime Video: M. S. Dhoni: The Untold Story

नेमकं काय घडलेलं? (MS Dhoni Angry On Sushant Singh Rajput)

महेंद्रसिंह धोनीच्या बायोपिकमध्ये सुशांत सिंह राजपूत यानं साकारलेली भूमिका पडद्यावर जरी सहज वाटत असली, तरी ती त्याच्या प्रचंड मेहनतीचं आणि तयारीचं फळ होतं. ही भूमिका पूर्ण निष्ठेनं साकारण्यासाठी सुशांतनं एम.एस. धोनीसोबत वेळ घालवला आणि त्यांच्याशी अनेकदा चर्चा केली. यावेळी, सुशांत सिंह राजपूत अनेकदा तोच प्रश्न पुन्हा-पुन्हा विचारायचा, जे असह्य झाल्यामुळे 'कॅप्टन कूल'चाही संयम सुटलेला.

mahendra singh dhoni

'एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी' सिनेमाच्या एका पत्रकार परिषदेतल्या व्हिडीओमध्ये सुशांत सिंह राजपूत म्हणालेला की, "धोनीचा संयम सुटताना पाहण्याची ती पहिलीच वेळ होती. सुरुवातीच्या दोन-तीन दिवसांत मी त्यांना प्रश्न विचारले आणि त्यांनी संयमानं उत्तरं दिली. मग ते म्हणाले, 'तू खूपच प्रश्न विचारतोस, मला नंतर येऊ दे... मग बघतोच...' मी फक्त तोच प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे पुन्हा-पुन्हा विचारत होतो..."

यावर पुढे बोलताना धोनी म्हणालेला की, "तो तोच-तोच प्रश्न वारंवार विचारायचा, जर त्याला तेच उत्तर मिळालं, तरंच त्याची खात्री पटायची की, मी खरं बोलतोय, आणि त्यानंतरच तो पुढच्या प्रश्नाकडे वळायचा..." धोनी पुढे म्हणालेला की, "सुरुवातीला स्वतःबद्दल बोलणं थोडं अवघडल्यासारखं वाटायचं. 15 मिनिटांनंतर स्वतःबद्दल बोलण्याचा कंटाळा येतो आणि मला वाटायचं, "मला थोडा ब्रेक हवा आहे, मी निघतोय...'" सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान, सुशांत आणि धोनीची मुलगी झिवा यांचे एकत्र खेळतानाचे व्हिडीओही व्हायरल झाले होते, ज्यातून त्या दोघांमधील जिव्हाळ्याचं नातं दिसून आलेलं.

सुशांत सिंह राजपूतच्या निधनामुळे धोनीला मोठा धक्का

14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतनं जगाचा निरोप घेतला. मुंबईतील त्याच्या राहत्या घरी हा अभिनेता मृत अवस्थेत आढळलेला. 'एम. एस. धोनी' सिनेमाचे दिग्दर्शक नीरज पांडे यांनी सांगितलेलं की, सुशांतच्या निधनाची बातमी ऐकून धोनीला मोठा धक्का बसलेला. नीरज यांनी 'xtratime.in' ला सांगितलंय की, "माही भाईंव्यतिरिक्त मी त्यांचे दोन जवळचे मित्र - मिहिर दिवाकर आणि अरुण पांडे - यांनाही फोन केला होता... ही अत्यंत दुःखद बातमी ऐकून ते सर्वजण खूप व्यथित झाले होते. माहीला तर मोठा धक्का बसला होता आणि ते पूर्णपणे कोलमडून गेले होते."

'भूमिकेपेक्षा ती साकारण्यासाठी कुणी बोलावलं, हे महत्त्वाचं'; ऑडिशन न देताच हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेचं वक्तव्य चर्चेत

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.