Devendra Fadnavis Speech : पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. सध्या राज्यात तुफान पाऊस सुरू आहे. पुणे, मुंबई, नाशिक या शहरांना पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. पुणे आणि मुंबईला जोडणार मिसिंग लिंक म्हणजेच कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळेही बराच गदारोळ झाला. विरोधकांनी मोठे आरोप केले. दरम्यान, आता याच सर्व आरोपांना फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
तेव्हा मधू दंडवते होते म्हणून…कनेक्टिंग लिंकचा विषय खूपच गाजला. या कनेक्टिंग लिंकबाबत विरोधकांनी केलेला सगळा खोटारडेपणा बाहेर आला. महायुती सरकारची हिम्मत होती म्हणूनच आम्ही कनेक्टिंग लिंक बांधून दाखवला. ज्या वेळी कोकण रेल्वे बांधायची वेळ आली, तेव्हा लोक असंच म्हणायचे की ही रेल्वे चालू शकणार नाही. या भागात दरड कोसळते असे सांगितले जायचे. परंतु तेव्हा मधू दंडवते या व्यक्तीमध्ये हिम्मत होती. त्यांनी ही रेल्वे बांधून दाखवली. त्यानंतर दरवर्षी दरड कोसळायची. परंतु त्यातून आपण शिकायचो. दरड कोसळणं बंद करायचो. भीतीने कोकण रेल्वे तयार केली नसती तर काय अवस्था राहिली असती.
आपण कनेक्टिंग लिंक तयार करून दाखवलामिसिंग लिंकचा इतिहासची असाच आहे. आघाडीचे सरकार होते. त्या आघाडीच्या सरकारमध्ये मिसिंग लिंकचा प्रस्ताव तयार झाला. तेव्हा आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी दोन पानी नोट लिहून 14 कारणं दिली आणि मिसिंग लिंकची फाईल बंद केली. पण आम्ही निर्णय केला की मिसिंग लिंक बांधायचाच. आपण हे करू शकतो, असं समजलं. आता आपण ते करून दाखवलं. आपण कनेक्टिंग लिंक तयार करून दाखवला. जगातला सगळ्यात रुंद बोगदा आपण तयार करून दाखवला. भारतातला सर्वात केबल स्ट्रेड ब्रिज आपण तयार करून दाखवला, असं देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं.
मी शिव्या प्रुफ आहे, पण…तसेच आपल्या भाषणात बोलताना त्यांनी फडणवीसांना म्हणजेच मला शिव्या द्या. मला त्याची सवय आहे. मी शिव्या प्रुफ आहे. पण महाराष्ट्राला बदनाम कराल तर मी सोडणार नाही, असा गर्भित इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.