सौरव गांगुलींच्या बायोपिक पोस्टरची तुफान चर्चा, तो सीन पुन्हा….दादा चित्रपटात नेमकं काय असणार?
Tv9 Marathi July 08, 2026 07:45 PM

Sourav Ganguly Film : भारताचा कधीकाळचे स्टार क्रिकेटर आणि भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्त्व मोठ्या हिमतीने करणारे दादा म्हणजेच सौरव गांगुली यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट येत आहे. या चित्रपटात सौरव गांगुली यांची जीवनगाथा सांगण्यात येणार आहे. सौरव गांगुली यांच्या जन्मदिनानिमित्त या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. दरम्यान, हे पोस्टर समोर येताच लोकांनी मात्र मोठी नाराजी व्यक्त केली आहे. हे पोस्टर आवडले नसल्याचे मत अने कनेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

दादा चित्रपटाचे पोस्टर रिलीज

सौरव गांगुली यांची भूमिका राजकुमार राव करत आहे. राजकुमार रावनेच या चित्रपटाचे पोस्टर आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर टाकले असून त्याने सौरव गांगुली यांनादेखी टॅग केले आहे. सौरव गांगुली यांच्या नेतृत्त्वात 2002 साली भारताने नेटवेस्ट ट्रॉफी जिंकली होती. विजय मिळाल्यानंत गांगुली यांनी अंगावरील शर्ट काढून खास सेलिब्रेशन केले होते. गांगुली यांचे हेच सेलिब्रेशन नंतर चांगलेच गाजले होते. सध्या जारी करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये हेच दृश्य पुन्हा एकदा उभारण्यात आले आहे.

नेटकऱ्यांचा संताप

परंतु नेटकऱ्यांना हे पोस्टर आवडलेले नाही. एका नेटकऱ्याने पोस्टरचे एडिटिंग खूपच खराब आहे, त्यापेक्षा एआयच्या मदतीने चांगले पोस्टर तयार करत आले असते, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर एका नेटकऱ्याने प्लीज हे पोस्टर डिलीट करा म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने मजाक लावली आहे का? असे विचारून नापसंती व्यक्त केली.

View this post on Instagram

A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)

चित्रपटात नेमकं कोण कोण असणार?

दरम्यान, या चित्रपटात सौरव गांगुली यांची भूमिका राजकुमार राव, डोना गांगुली (पत्नी) यांची भूमिका तान्या मानिकतला, निरुपा गांगुली (आई) यांची भूमिका अपराजिता आढया तर चंडी गांगुली (वडील) यांची भूमिका शाश्वत चटर्जी हे करताना दिसणार आहेत. सौरव गांगुली यांचा चित्रपट नेमका कसा असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या चित्रपटात सौरव गांगुली यांच्या जीवनाचे काही पौलू दाखवण्यात येतील. तसेच गांगुली यांच्या नेतृत्त्वात भारतीय संघाची वाटचाल कशी राहिली यावरही प्रकाश टाकला जाणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.