‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत गार्गी फुले म्हणाल्या, “मी आधीही एक-दोन मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, रीलस्टार हे कलाकार नाहीत. ते फक्त स्टार आहेत. फॉलोअर्सची संख्या पाहून काही वाहिन्यांनी त्यांना कामे दिली, पण त्यामुळे ते कलाकार होत नाहीत. यासाठी मी खूप ट्रोलिंगला सामोरे गेले. अनेकजण म्हणाले की, आम्ही कंटेंट तयार करतो, त्यात मेहनत नसते का?
पुढे त्या म्हणाल्या, मी त्याची मेहनत स्वीकारते, पण जेव्हा अभिनयाचा प्रश्न येतो, तेव्हा गोष्ट वेगळी आहे. खऱ्या कलाकारांची १०-१० वर्षांची मेहनत, संघर्ष आणि शिकवण असते. फक्त ‘मी अभिनेता आहे’ असे म्हणून कुणी अभिनेता होत नाही.”
टोल नाक्याच्या घटनेवर भाष्य करताना त्या पुढे म्हणाल्या, “एका रीलस्टारचा टोल नाक्यावरचा व्हिडीओ पाहून मला गंमत वाटली. तुम्ही रीलस्टार आहात म्हणजे काय? सरकारचे नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. तुम्हाला टोल द्यावा लागेल. हे फुकटात उपलब्ध आहे म्हणून लोक बघतात. यावर पैसे लावले तर हे बघणंही बंद होईल.”