Vasai Velankanni Pilgrims Protest: वेलंकन्नी भाविकांची वसई स्टेशनवर ठिय्या आंदोलन; ट्रेन वळवून हजारो प्रवासी अडकले, पर्यायी व्यवस्थेची रेल्वेकडे मागणी
esakal July 10, 2026 03:45 AM

विरार : वेलंकन्नी येथील पवित्र मरिया मातेच्या नोव्हेनासाठी जाणाऱ्या वसई-विरारमधील हजारो भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे. अहमदाबाद जंक्शन–तिरुचिरापल्ली एक्स्प्रेस पूर्वकल्पना न देता सोलापूर मार्गे वळवल्यामुळे संतप्त प्रवाशांनी वसई रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन पुकारले आहे.

वसई विरार शहरात मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव वास्तव्यास आहेत. दरवर्षी तमिळनाडूतील वेलंकन्नी येथे लाखो भाविक पवित्र मरिया मातेच्या नोव्हेनासाठी जातात. वेलंकन्नी येथील पवित्र मरिया माता यांचा वार्षिक उत्सव दरवर्षी ३० ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. ८ सप्टेंबर हा मातेचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो. या उत्सवाच्या तयारीसाठी ९ दिवसांची विशेष प्रार्थना (नोव्हेना) केली जाते.वेलंकन्नी येथे जाणारी अहमदाबाद जंक्शन–तिरुचिरापल्ली एक्स्प्रेस गुरुवारी दुपारी ४ वाजता वसई रेल्वे स्थानकातून सुटणार होती. मात्र मुसळधार पावसामुळे ही गाडी सुरतपूर्वी सोलापूर मार्गे वळविण्यात आली. या बदलाची माहिती प्रवाशांना दुपारी साडेबारा वाजता संदेशाद्वारे देण्यात आल्याने वसई-विरारमधील आरक्षण केलेले हजारो भाविक वसई रेल्वे स्थानकात अडकून पडले आहेत.

“मार्ग बदलाची माहिती सकाळीच मिळाली असती तर ते सुरतला जाऊन गाडी पकडू शकले असते. मात्र उशिरा सूचना मिळाल्याने प्रवास खोळंबला आहे”, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली. तसेच रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना तिकीट रद्द करून परतावा घेण्याचा आणि पुढील प्रवासाची पर्यायी व्यवस्था स्वतः करण्याचा सल्ला दिला जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.तसेच काही भाविकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत, “पर्यायी प्रवासाची व्यवस्था रेल्वेनेच करून द्यावी. अन्यथा आम्ही वसई रेल्वे स्थानक सोडणार नाही”, असा इशारा देत रेल्वे स्थानकात ठिय्या मांडला आहे.रात्री उशिरा पर्यंत हे आंदोलन सुरु होते.

यावेळी वसई,विरार ,उत्तन, भायंदर येथून हजारोंच्या संख्येने भाविकानी वेलंकनी येथे दि. 9.7.2026 रोजी जाण्यासाठी ट्रेन नबर 09419 अहमदाबाद ते त्रीचीला जाणाऱ्या ट्रेनची दोन महिणे आगाऊ बुकिंग केलेली होती. व सर्वाची कन्फर्म टिकिटे होती. अशा रितीने सर्व भाविक दि. 9.7.2026 वेळेवर वसई स्टेशनला ट्रेन पकडण्याची आले असता, त्याना धक्काच बसला. कारण कूठलेहि कारण न देता सदरहु ट्रेन परस्पर सुरतहून पुणे मार्गे रवाना करण्यात आली. व हजारो भाविक वसई स्टेशनवर अडकून पडले. साहजिकच यामुळे भाविकाचा रोष अनावर होऊन, त्यानी आंदोलन पुकारले. भाविकाचा आक्रोश होता कि हजारो भाविकानी वेळेवर बुकिंग केलेले आहे. इतकेच नाही तर सर्व भाविकानी वेलंकनी येथे राहण्यासाठी हाॅटेल व रूम सुध्दा बूक केलेली आहेत. असे असताना जर ट्रेनच रद्द केली जात असेल तर भाविकाना न्याय कोण देणार.

चार्ली रोझारिओ,वेलंकनी प्रवासी संघटना

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.