...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
भाग्यश्री कांबळे July 10, 2026 09:43 PM

Aadesh Bandekar on Eknath Shinde: अयोध्येच्या राम मंदिरातील (Ram Mandir) चोरी  प्रकरणामुळे संपूर्ण भारतात रोष व्यक्त केला जात आहे.  पोलीस तपासातून (Eknath Shinde) नवनवीन खुलासे होत आहे. दरम्यान, या प्रकरणावरुन काही राजकीय नेत्यांकडूनही रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान, विधान  परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही गंभीर आरोप केले आहेत.  महाविकास आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळात जेव्हा श्री सिद्धीविनायकच्या मंदिरात (Shree Siddhivinayak mandir) दानपेटी लुटली गेली,  तेव्हा कारवाई का करण्यात आली नाही? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. एकनाथ शिंदे यांनी त्यावेळेला मंदिराचे विश्वस्त असलेल्या आदेश बांदेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.  आदेश बांदेकर यांचे नाव न घेता एकनाथ शिंदे यांनी आरोप केले आहेत.  दरम्यान, यावर श्री सिद्धीविनायक मंदिराच्या (Aadesh Bandekar) ट्रस्टचे माजी अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदेंच्या आरोपांवर आदेश बांदेकर नेमकं काय म्हणाले? (Siddhivinayak Temple Controversy)

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आरोपांवर आणि जळजळीत प्रश्नांवर, आदेश बांदेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. 'एकतर मी वारीमध्ये आहे,  त्यामुळे याच्याबाबतील व्यवस्थित काही पाहिलेलं नाही. पण तरी सुद्धा माझं एवढंच म्हणणं आहे की, माझा कार्यकाळ संपून 3 वर्ष होऊन गेलेली आहेत. आता 3 वर्षात  जे कुणा तिथे पदाधिकारी आहेत,  त्यांच्याचकडे सगळा कारभार होता'.

'तसेच साधारण साडे तीन, 4 वर्षांपूर्वी विधी अन् न्याय विभागाकडे  याबाबतचा  विषय अधिवेशनात आला होता. कारण, श्री सिद्धीविनायक मंदिराची जी यंत्रणा आहे, त्या यंत्रणेमध्ये जे जे  कार्यकारी अधिकारी असतात. ते मंत्रालयातून नियुक्त  केले जातात.  त्याचबरोबर फायनान्स ऑफिसर हे देखील मंत्रालयानेच नियुक्त केलेला असतो.  त्यामुळे शासकीय कारभारात किंवा या बाबतीत कोणताही गैरव्यवहार आढळला असेल तर, तसं त्यांनी जाहीर करायला हवं', असं आदेश बांदेकर म्हणाले. 

'कुठल्यातरी बातमीवर कुठलीतरी गोष्ट उगाच आपटण्याला काहीही अर्थ नाही. आणि जर त्याच्यात काही आढळलं असेल, साडेतीन वर्ष झालेली आहेत.  साडेतीन वर्ष कोण अध्यक्ष होतं, हे सर्वांना माहिती आहे.  त्यांनी काही कागदात फेरफार केले असतील.  तर नवा संशय आणि त्याची चौकशी होणं आवश्यक आहे.  आणि जर त्यात कुणीही दोषी आढळलं, अगदी जर मी सुद्धा दोषी म्हणून आढळलो तर,  त्याच मंदिरासमोर हवं तर मला फासावर द्या. पण उगाच खोटे आरोप करु नका.  कारण सगळ्याच गोष्टी वेळोवेळी स्पष्टपणे जाहीर केल्या आहेत. आमच्या कार्यकाळात जर 1 गोष्टही चुकीची घडली असेल तर, मला फासावर द्या.. राम कृष्ण हरी', असं आदेश बांदेकर म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.