England Women vs India Women, Lord's Test, 1st Day report: भारताचा महिला संघ सध्या इंग्लंडमध्ये असून टी२० वर्ल्ड कपमधील अपयश विसरून आता पुढील तयारीला लागला आहे. सध्या भारतीय संघ इंग्लंड महिला संघाविरुद्ध लॉर्ड्सवर ऐतिहासिक कसोटी सामना खेळत आहे. शुक्रवारी (१० जुलै) भारत आणि इंग्लंड महिला संघात लॉर्ड्सवर कसोटी सामना सुरू झाला आहे. हा सामना खास आहे कारण लॉर्ड्सवर पहिल्यांदाच महिलांचा कसोटी सामना खेळवला जात आहे. यापूर्वी या मैदानात महिलांचा कसोटी सामना झाला नव्हता.
दरम्यान, या सामन्यात भारताचा पहिला डाव पहिल्याच दिवशी संपला आहे, पण भारताकडून स्मृती मानधना (Smriti Mandhana), कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि दीप्ती शर्माने (Deepti Sharma) चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या दिवस अखेर इंग्लंड २६४ धावांनी पिछाडीवर आहे.
या सामन्यात इंग्लंडची कर्णधार नतालिया सायव्हर-ब्रंट हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाकडून पहिल्या डावात स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी डावाची सुरुवात केली. मात्र दुसऱ्याच षटकात लॉरेन फिरले शफालीला शून्यावरच बाद केलं. त्यानंतर ७ व्या षटाकत यास्तिका भाटियाही १२ धावांवर लॉरेन बेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाली.
IND vs ENG: भारताला ऐतिहासिक लॉर्ड्स कसोटीपूर्वी धक्का! प्रमुख फलंदाज संघातून बाहेर, बदली खेळाडूची BCCI कडून घोषणामात्र यानंतर भारताचा डाव मानधना आणि जेमिमाह रोड्रिग्स यांनी अर्धशतकी भागीदारी करत सावरला. या दोघींच्या जोडीने भारताला १०० धावांचा टप्पा पार करून दिला होता. यादरम्यान मानधनाचे अर्धशतकही झाले होते. पण खेळपट्टीवर स्थिरावलेल्या जेमिमाहला १९ व्या षटकात इझी वाँगने त्रिफळाचीत करत ३५ धावांवर माघारी धाडले. त्यामुळे तिची मानधनासोबतची ६४ धावांची भागीदारी तुटली. पण नंतर मानधनाला कर्णधार हरमनप्रीत कौरची भक्कम साथ मिळाली.
मानधाना आणि हरमनप्रीत या दोघींनीही ८९ धावांची भागीदारी केली. यादरम्यान, हरमनप्रीतचे अर्धशतकही झाले. तसेच मानधना शतकाकडे वाटचाल करत होती. पण ४५ व्या षटकात इझी वाँगनेच एमी जोन्सच्या हातून झेलबाद केले. स्मृती मानधनाने १०८ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकारासह ८३ धावा केल्या. हरमनप्रीतही ५२ व्या षटकात बाद झाली, तिला मॅडी विलियर्सने त्रिफळाचीत केले. हरमनप्रीतने १२१ चेंडूत ७ चौकारांसह ५८ धावा केल्या.
नंतर दीप्ती शर्माने तळातल्या फलंदाजांना साथीला घेत भारताचा डाव पुढे नेला. रिचा आणि स्नेह राणा प्रत्येकी १३ धावा करून बाद झाल्या. तसेच सायली सतघरे १ धावेवर बाद झाली. पण या विकेट जात असताना एका बाजूने दीप्ती चांगली खेळत होती. तिने अर्धशतकही केले. पण तिला सोफी एक्लेस्टोनने बाद केले. दीप्तीने ८७ चेंडूत ७ चौकारांसह ५७ धावा केल्या. शेवटी क्रांती गौड १ धावेवर एक्लेस्टोनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाली. त्यामुळे भारताचा डाव ७४.५ षटकात २८५ धावांवर संपला.
इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच लॉरेन फिलर, इझी वाँग आणि मॅडी विलियर्स यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. लॉरेन बेलने १ विकेट घेतली.
IND vs ENG: टीम इंडियाच्या खराब कामगिरीची BCCI ने घेतली गंभीर दखल; वनडे मालिकेनंतर होणार मोठी बैठक, देवजित सैकिया यांची माहिती इंग्लंडनेही लवकर गमावली पहिली विकेटभारताचा डाव संपल्यानंतर इंग्लंडचा संघ पहिल्या डावात फलंदाजीला उतरला होता. इंग्लंडकडून माया बुशियर आणि टॅमी ब्युमाँट यांनी डावाची सुरुवात केली होती. पण चौथ्याच षटकात क्रांती गौडने ब्युमाँटला २ धावांवर पायचीत पकडले. त्यामुळे हिदर नाईट फलंदाजीला आली. त्यानंतर पहिला दिवस संपेपर्यंत विकेट गेली नाही. इंग्लंडने पहिला दिवस संपला तेव्हा ११ षटकात १ बाद २१ धावा केल्या होत्या. तसेच ते अद्याप २६४ धावांनी पिछाडीवर आहेत.