कन्या राशी (Virgo Daily Horoscope) – छोट्या गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा मोठ्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. आरोग्याची काळजी घ्या. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील आणि अविवाहितांना एखादी खास व्यक्ती भेटू शकते. कुटुंबातील जुने प्रश्न पुन्हा समोर येऊ शकतात, मनस्ताप वाढेल.
तुळ राशी (Libra Daily Horoscope) – आजची सुरुवात थोडी संथ होईल, पण दिवस जसजसा पुढे जाईल तसतशी परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. कुटुंबातील एखादा वाद चर्चेने मिटू शकतो. आज बोलताना शब्द जपून वापरा. घरी पाहुणे आल्याने आनंदाचं वातावरण तयार होईल.
वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope) – छोट्या-छोट्या गोष्टींवर रागावण्यापेक्षा शांत राहिलात तर अनेक गोष्टी तुमच्या बाजूने घडतील. एखाद्या गरजूला मदत केल्याने मनाला समाधान मिळेल. प्रवासात एखादी महत्त्वाची माहिती मिळू शकते, जी पुढे उपयोगी पडेल. आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे अडकलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे.
धनु राशी (Sagittarius Daily Horoscope) – लांबच्या प्रवासाचा बेत आखला जाऊ शकतो. कामाच्या ठिकाणी नवीन गोष्टी शिकण्याची आणि प्रगती करण्याची संधी मिळेल. अध्यात्म आणि ज्ञानाविषयीची आवड वाढेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक शिस्त ठेवण्याची गरज आहे.
मकर राशी (Capricorn Daily Horoscope) – आज खर्चांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. घाईघाईत घेतलेले निर्णय टाळा. काही नवीन विरोधक समोर येऊ शकतात, त्यामुळे तुमच्या योजना सर्वांसमोर उघड करू नका. कर्जासाठी प्रयत्न करत असाल, तर यश मिळू शकतं. मुलांच्या शिक्षणाबाबतची चिंता कमी होईल.
कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope) – व्यवसाय किंवा नोकरीत तुमची वेगळी विचारसरणी तुम्हाला खास ओळख मिळवून देईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आई तुमच्यावर एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपवू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांचं कौतुक होईल. पदोन्नती किंवा नवीन जबाबदारीबाबतही चांगली बातमी मिळेल.
मीन राशी (Pisces Daily Horoscope) – नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळू शकते. नातेसंबंधांमध्ये समतोल राखणं महत्त्वाचं ठरेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामं आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. टीमवर्कच्या जोरावर मोठं यश मिळू शकतं. काही लोक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, पण तुमच्या समजूतदारपणामुळे आणि सतर्कतेमुळे संकट टळेल. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)