उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील नगर कोतवाली भागातील अर्जुन नगर परिसरात दागिने खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला पाण्याऐवजी ॲसिड किंवा तत्सम रासायनिक पदार्थ देण्यात आला. दोन घोट प्यायल्यानंतर त्या तरुणीची प्रकृती खालावली. तिला गंभीर अवस्थेत मेरठला दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
तहान लागली आणि घात झाला
कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, अर्जुन नगर परिसरातील रहिवासी राकेश यांची मुलगी रिया, शुक्रवारी संध्याकाळी तिची आई अंजना राघव यांच्यासोबत त्याच परिसरातील एका सराफाच्या दुकानात दागिने खरेदी करण्यासाठी गेली होती. या भेटीदरम्यान तिला तहान लागली आणि तिने सराफाकडे पाणी मागितले