-कृष्णकांत कोबल
हडपसर : "जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया" विठु माऊली भेटीची अशी आस घेऊन पंढरीकडे निघालेल्या वैष्णव मेळ्याचे हडपसरकरांसह परिसरातील भाविकांनी "ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या नामघोषात उत्साहात स्वागत केले. दरम्यान, काही काळ येथे विसावलेल्या या सोहळ्याला आलेल्या भाविकांनी "पुंडलिकवरदे हरी विठ्ठल' च्या गजरात तितक्याच भावपूर्ण वातावरणात निरोपही दिला.
Milk Rate: दूध उत्पादकांना दिलासा! गायीच्या दुधाचा दर ४१ रुपयांवर; तुकाराम मुंढे इफेक्ट, राज्यातील संकलनात २० लाख लिटरची घटमहापौर मंजुषा नागपुरे, आमदार चेतन तुपे पाटील, आमदार योगेश टिळेकर, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त अरविंद माळी, संदीप कदम, सहायक आयुक्त कुणाल धुमाळ, प्रभात समिती अध्यक्ष प्रशांत तुपे, नगरसेवक वैशाली बनकर, हेमलता मगर, उज्ज्वला जंगले, अजित घुले, सारिका घुले, नितीन गावडे, मारुती तुपे, डॉ. दादा कोद्रे, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, डॉ. शंतनु जगदाळे, अमर तुपे, उद्योजक राहुल तुपे, ईशान तुपे, विजय देशमुख, सुनील बनकर, नितीन आरू, सोनाली घुले, दीपाली कवडे, सविता हिंगणे, हवेली तालुका तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष विकास गायकवाड पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
शहरातील दोन दिवसांचा मुक्काम संपवून दोन्हीही संताचा पालखी सोहळा हडपसरमध्ये दाखल झाला. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तर दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे गाडीतळ येथील विसावास्थळी आगमन झाले. हरिनामाचा जयघोष, टाळ मृदंगाचा नाद आणि रांगोळीच्या पायघड्यांनी हडपसरकरांनी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले.
परिसरातील वाघोली, मांजरी खुर्द, मांजरी बुद्रुक, आव्हाळेवाडी, केसनंद, कोलवडी, चंदननगर, खराडी, मुंढवा, केशवनगर, साडेसतरानळी, कोंढवा, महंमदवाडी, ससाणेनगर, उंड्री, पिसोळी, औताडेवाडी, हांडेवाडी, वडाचीवाडी, होळकरवाडी आदी भागातील नागरिक यावेळी मोठ्याप्रमाणात विसावास्थळी दर्शनासाठी एकत्र आले होते. दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती. शहर व परिसरातील अनेक भाविक निरोप देण्यासाठी सोहळ्यात सहभागी झाले होते. मार्गावरील शेवाळवाडी, मांजरी फार्म, सातववाडी, गोंधळेनगर, तुकाई दर्शन आदी परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन पालखीतील पादुकांचे दर्शन घेतले.
Organic farming: सेंद्रिय शेतीचा चमत्कार! वेल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्याच्या झाडाला तब्बल १९ किलोचा फणस; डोंगररानात सेंद्रिय शेतीची झेप..गाडीतळ येथील मुख्य बसथांब्याच्या प्रांगणात संत ज्ञानेश्वर महाराजांचा तर सोलापूर महामार्गावरील उड्डाणपुलालगत संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ विसाव्यासाठी थांबविण्यात आला होता. पालिका व पोलिस प्रशासनाने केलेल्या नियोजनानुसार पंचक्रोशीतील नागरिकांनी रांगेने पालखीतील पादुकांचे दर्शन घेतले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा काहिशा विश्रांतीनंतर सकाळी दहा वाजता सासवड रस्त्याने तर, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दोन तासांच्या विश्रांतीनंतर दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास सोलापूर रस्त्याने भाविकांनी केलेल्या माऊली-माऊलीच्या नामघोषात पुढील मुक्कामी मार्गस्थ झाला.