Shraddha Walkar Murder Case: देशाला हादरवणारे श्रद्धा वालेकर हत्याकांडाची सुनावणी पुन्हा एकदा तहकूब झाली आहे. दिल्लीच्या साकेत कोर्टाने २० जुलैची सुनावणी करण्याची तारीख रद्द केली आहे. या प्रकरणातील हत्यारा आरोपी श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याने त्या दिवशी आपली एमए ( समाजशास्र ) ची परीक्षा असल्याचे कारण देत सुनावणी स्थगित करण्याची मागणी केली होती. कोर्टाने आरोपीचा हा अर्ज स्वीकारुन नवी तारीख नंतर घोषीत करु असे सांगत २० जुलै रोजीची सुनावणी पुढे ढकलली आहे.
कोर्टाने आरोपीचा अर्ज स्वीकारलाया Shraddha Walkar हत्याकांडाची सुनावणी सुरु असणाऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरगुरविंदर सिंह जग्गी यांनी आरोपीने दाखल केलेल्या अर्जावर विचार केल्यानंतर २० जुलै रोजी निश्चित केलेली सुनावणी आता पुढे ढकलली आहे.आरोपीचा त्याच दिवशी एमएचा पेपर असल्याने त्या दिवशी सुनावणी होऊ शकत नाही असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरगुरविंदर सिंह जग्गी यांनी सांगितले.
तिहार तुरुंगात परीक्षा देणार आफताबआफताब अमीन पूनावाला याच्यावर श्रद्धा वालकर हीच्या हत्येचा खटला सुरु आहे. त्याची एमए (समाजशास्त्र) ची परीक्षा तो इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालयाच्या (IGNOU) परीक्षा तिहार जेल परिसरातील केंद्रात होणार आहे. सध्या आरोपी आफताब हा न्यायालयीन कोठडीत आहे.
2022 चे गाजलेले हत्याकांडदिल्लीतील छत्तरपूर येथील घरात श्रद्धा वालकर हीची निर्घृण हत्या झाली होती.श्रद्धाचा खून १८ मे २०२२ रोजी करण्यात आला होता.आरोपी आफताब याने पुरावा नष्ट करण्यासाठी श्रद्धाच्या मृतदेहाचे सुमारे ३५ तुकडे केले होते. आणि ते दिल्लीतील वेगवेगळ्या जंगलात फेकून दिले होते.श्रद्धा हिच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये या प्रकरणाचा उलगडा झाला होता.