Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित
esakal July 12, 2026 02:45 AM

जालना : एक सप्टेंबर २०२३ रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनकर्तेे मनोज जरांगे  उपोषण करत असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. तर, पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. यामध्ये मराठा आंदोलकांसह पोलिसही जखमी झाले होते. यातून जिल्ह्यात एकूण ७४ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी आतापर्यंत न्यायालयातून ३९ गुन्हे मागे घेतले आहेत. तर, शिफारस केलेल्या १० गुन्ह्यांचा प्रस्ताव न्यायालयात अंतिम निर्णयासाठी प्रलंबित आहे. तर, पाच गुन्हे कायम ठेवण्यात आले आहेत.

Milk Rate: दूध उत्पादकांना दिलासा! गायीच्या दुधाचा दर ४१ रुपयांवर; तुकाराम मुंढे इफेक्ट, राज्यातील संकलनात २० लाख लिटरची घट

अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनावर झालेल्या लाठीमारानंतर राज्यभर पडसाद उमटले होते. या घटनांप्रकरणी जिल्ह्यात एकूण ७४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी मनोज जरांगे यांनी लावून धरल्यानंतर राज्य शासनाने जिल्हास्तरीय त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती.

या समितीने दाखल गुन्ह्यांची तपासणी करून एकूण ४९ गुन्हे मागे घेण्याची शिफारस केली. त्यानुसार आतापर्यंत ३९ गुन्हे न्यायालयीन प्रक्रियेनंतर मागे घेण्यात आले आहेत. तर, शिफारस केलेल्या उर्वरित दहा गुन्ह्यांबाबत शासनाचा प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित असून त्यावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे.

Organic farming: सेंद्रिय शेतीचा चमत्कार! वेल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्याच्या झाडाला तब्बल १९ किलोचा फणस; डोंगररानात सेंद्रिय शेतीची झेप..

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात  ४९ गुन्ह्यांची शिफारस समितीकडून करण्यात आली होती. या शिफारशीनुसार न्यायालयातून ३९ गुन्हे मागे आतापर्यंत घेण्यात आले आहेत. तर दहा गुन्ह्यांचा प्रस्ताव न्यायालयात दाखल केला आहे. तर पाच लाखांपेक्षा अधिक नुकसान आणि शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाणीचे पाच गुन्हे कायम आहेत.

-तेघबिरसिंह संधू, पोलिस अधीक्षक, जालना

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.