India vs England 5th T20I Marathi Cricket News: भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सपशेल शरणागती पत्करली. इभ्रत वाचवण्यासाठी पाचव्या ट्वेंटी-२०त मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला पुन्हा अपयश आले. इंग्लंडच्या २५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रेयस अय्यरचा संघ ५६ धावांवर गडगडला. इंग्लंडने ही मालिका ४-० अशी जिंकली आणि भारतीय संघाचा हा पाच ट्वेंटी-२० सामन्यातील सर्वात लाजीरवाणा पराभव ठरला.
मालिका विजयामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी आज दमदार खेळ केला. भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना यजमानांनी ३ बाद २५७ धावांचा डोंगर उभा केला. जॉस बटलरने ६४ चेंडूंत १२ चौकार व ८ षटकारांसह १३१ धावांची वादळी खेळी केली. कर्णधार हॅरी ब्रूक ४५ चेंडूंत ४ चौकार व ८ षटकारांसह नाबाद ९५ धावा केल्या. शिवम दुबेने १ षटकात २२ धावा देत २ विकेट्स घेतल्या.
India vs England ODI : इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर, कारण काय?संजू सॅमसनला पुनरागमनाच्या संधीवर अपयश आले. तो १४ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह २७ धावांवर बाद झाला. अभिषेक शर्मा ३ धावांवर बाद झाला. इशान किशन व कर्णधार श्रेयस अय्यर यांनी संघाचा डाव सावरला. अय्यरला डॉसनने २८ धावांवर माघारी पाठवले, परंतु इशानने खिंड लढवली आणि ३५ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५६ धावांची खेळी केली. इशानच्या विकेटनंतर शिवम दुबेचा झेल ब्रूकने टाकला आणि त्याचा फायदा शिवमने उचलता आला नाही. तो १४ धावांवर माघारी परतला.
संपूर्ण मालिकेत अपयशी ठरलेल्या तिलक वर्माला संघातील जागा जातेय असे दिसताच सूर गवसला. त्याने २५ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली. तिलकने या मालिकेत भारतासाठी दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात वेगवान धावा केल्या. यापूर्वी डरहॅम येथे अभिषेक शर्माने केलेल्या २० चेंडूंतील ५० धावा केल्या होत्या. तोपर्यंत सामना भारताच्या हातून निसटला होता. १२ चेंडूंत ६९ धावांची गरज असताना सूर्यांश शेडगे ७ धावांवर माघारी परतला. भारताला ८ बाद २०१ धावाच करता आल्या आणि इंग्लंडने ५६ धावा केल्या.