Sunita Ahuja : नेहमी गोविंदाला घालून पाडून बोलणारी सुनीता लॉकअप 2 मधून बाहेर आल्यावर जे बोलली ते ऐकून कानांवर विश्वास नाही बसणार
Tv9 Marathi July 12, 2026 08:45 PM

गोविंदाची पत्नी सुनीता आहूजा रियलिटी शो ‘लॉकअप 2’ मधून बाहेर आली आहे. शनिवारी 11 जुलैला जजमेंट डे च्या एपिसोडवेळी गोविंदा आणि त्याची मुलगी टीना आहूजा तिला आणण्यासाठी तिथे गेले होते. शो मध्ये असताना सुनीता अनेकदा लग्नामध्ये होणाऱ्या फसवणुकीबद्दल बोलताना दिसली. गोविंदाची अनेक प्रेम प्रकरणं होती असा तिने दावा केला. बाहेर आल्यानंतर सुनीता आहूजा शो मधील तिचा अनुभव, लग्नावरचा विश्वास आणि प्रेमाबद्दल बोलली. त्या सोबतच सुनीता विवाहबाह्य संबंधांबद्दल सुद्धा मोकळेपणाने बोलली. इंडस्ट्रीमध्ये हे खूप कॉमन असल्याचं तिने म्हटलं. ‘गोविंदाला मी कधीही सोडणार नाही’ हे सुद्धा सुनीताने सांगितलं.

सुनीता आहूजागोविंदाला अनेकदा घालून पाडून बोलताना दिसते. त्याच्यावर वेगवेगळे आरोप करत असते. पण ‘लॉकअप’ सीजन 2 मधून बाहेर आल्यानंतर तिने गोविंदावरच आपलं प्रेम व्यक्त केलं. कितीही आव्हानं आली, तरी गोविंदाला सोडणार नाही असं तिने म्हटलं. विश्वास आणि माफ करण्याची सवय यामुळे अजूनही एकत्र आहोत असं 40 वर्षाच्या नात्याबद्दल बोलताना सुनीता म्हणाली. कुठल्याही फिल्म स्टार सोबत लग्न करण्यासाठी दगडासारखं ह्दय हवं. खऱ्या प्रेमाचा अर्थ माफ करणं आणि पुढे जाण आहे असं सुनीता म्हणाली.

एक मोठी अचीवमेंट आहे

गोविंदासोबत इतकी वर्ष साथ टिकून आहे, त्या बद्दलही सुनीता बोलल्या. “बघा, आजही आम्ही एकत्र आहोत. आम्ही ऐकमेकाशिवाय जगू शकत नाही. मी शिल्पा शिंदेला बोलले. ते माझे पती आहेत. मी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची साथ कधी सोडणार नाही. भले, ते काहीही करो. आम्ही 40 वर्ष एकत्र घालवली आहेत. हा काही जोक नाही. इतकी वर्ष फिल्म इंडस्ट्रीत टिकून राहणं एक मोठी अचीवमेंट आहे. आजही आम्ही एकत्र आहोत. परस्परांवर प्रेम करतो” असं सुनीता अहूजा म्हणाल्या.

अभिनेत्याची बायको बनण्यासाठी दगडाचं ह्दय हवं

चीटिंग, विश्वास आणि माफी बद्दल बोलताना सुनीता आहूजा म्हणाली की, “विश्वास मोठी गोष्ट आहे. मला नाही वाटतं की, फिल्म इंडस्ट्रीत कुठला हिरो धुतल्या तांदळासारखा आहे. आमच्यापेक्षा ते लोक जास्तवेळ हिरॉइन सोबत घालवतात. बऱ्याच गोष्टी तुमच्या प्रेमावर सुद्धा अवलंबून आहेत. तुम्ही या गोष्टी कशा स्वीकारता, परिस्थितीचा कसा सामना करता. मी नेहमी म्हटलय की अभिनेत्याची बायको बनण्यासाठी दगडाचं ह्दय हवं. प्रेम खरं असतं, तेव्हा तुम्ही माफ करता आणि पुढे जाता”

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.