Astrology marathi : अनेक जण प्रेमासाठी स्वतःचे उज्ज्वल भविष्य पणाला लावतात. अंकशास्त्रात (Numerology) अशा ३ मुलांकांचा उल्लेख आहे, जे पार्टनरसाठी आपल्या चांगल्या चाललेल्या करिअरचा बळी देतात. सुरुवातीला घेतलेला हा भावनिक निर्णय पुढे जाऊन त्यांची मोठी चूक ठरतो, कारण समोरची व्यक्ती या त्यागाची साधी जाणीवही ठेवत नाही.
मुलांक २कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० किंवा २९ तारखेला जन्मलेल्यांचा मुलांक २ असतो. चंद्राच्या प्रभावामुळे हे लोक कमालीचे संवेदनशील असतात.
पार्टनरला खूश करण्यासाठी किंवा त्याला वेळ देण्यासाठी हे करिअरच्या सुवर्णसंधी नाकारतात. पण जेव्हा जोडीदाराकडून अपेक्षित प्रेम मिळत नाही, तेव्हा त्यांना स्वतःच्या निर्णयाचा तीव्र पश्चात्ताप होतो.
Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर मुलांक ६६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक ६ असतो. शुक्राच्या प्रभावामुळे हे नात्याला आणि कुटुंबाला सर्वस्व मानतात.
नात्यात अंतर येऊ नये म्हणून हे स्वतःच्या मोठ्या महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून नोकरी-व्यवसाय सोडतात. मात्र, पुढे जाऊन जोडीदार या त्यागाला केवळ 'कर्तव्य' समजतो तेव्हा यांचे हृदय पूर्णपणे तुटते.
Marriage Numerology : 'या' मुलांकाच्या लोकांना बायकोच्या रूपात मिळते लक्ष्मी; पतीच्या यशामागे असतो फक्त तिचाच हात मुलांक ९९, १८ किंवा २७ तारखेला जन्मलेल्यांचा मुलांक ९ असतो. मंगळाच्या प्रभावामुळे हे प्रेमात अत्यंत प्रामाणिक असतात.
जोडीदाराच्या सुखासाठी हे स्वतःच्या करिअरकडे साफ दुर्लक्ष करतात. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात ज्याच्यासाठी भविष्य पणाला लावले, तीच व्यक्ती कृतघ्न झाल्याचे पाहून यांना आयुष्यभर मानसिक वेदना सहन कराव्या लागतात.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.