एका सेकंदात 740 कोटींची मालकीण, एका घटनेमुळं महिलेचं नशीबच पालटलं, असं काय घडलं?
Tv9 Marathi July 14, 2026 01:45 AM

आपल्या देशात कधी काय होईल, हे अजिबात सांगता येत नाही. कधी एखाद्या भिकाऱ्याला अचानक लॉटरी लागल्याने तो करोडपती होतो. तर कधी अब्जोपती व्यक्ती क्षणात भिकेला लागते. सध्या मात्र एक अजब प्रकार समोर आला आहे.

महिला क्षणात झाली अब्जोपती

मिळालेल्या माहितीनुसार बिहारमधील सुपौल येथील एक अंगणवाडी सेविका आपल्या बँक खात्यातून 2100 रुपये काढण्यासाठी गेली होती. परंतु तिच्या बँकेत असलेला पैशांचा आकडा पाहून ती थक्कच झाली. क्षणात ती करोडपती झाली.

या महिलेचे नाव गीता देवी असे आहे. ही महिला 10 जुलै 2026 रोजी सीएससी केंद्रावर 2100 रुपये काढायला पोहोचली होती. तिने पैसे काढले आणि सीएससी संचालकाला खात्यात किती पैसे शिल्लक आहेत, याबाबत विचारले. सीएससी संचालकाने त्या महिलेच्या बँक खात्यातील रक्कम पाहिली आणि तो अवाकच झाला.

खात्यात आले 7 अब्ज रुपये

त्या महिलेच्या बँक खात्यात तब्बल 7 अब्ज म्हणजेच 740 कोटी रुपये रुपये होते. ही रक्कम पाहून गीता देवी यादेखील थक्कच झाल्या. त्याचे पती प्रदीप कुमार पंजाबमध्ये मजुरीचे काम करतात. त्यामुळे एवढे सारे पैसे ने्मके कुठून आले, असा प्रश्न त्यांना पडला.

10 हजार रुपये काढण्यास सांगितले, पण…

दरम्यान, खात्यात एवढे सारे पैसे नेमके कसे आले, याचा शोध घेण्यासाठी गीता देवी यांनी सीएससी संचालकाला बँक खात्यातून आणखी 10 हजार रुपये काढण्यास सांगितले. परंतु त्यांचे बँक खाते लगेच फ्रीझ झाले. दरम्यान गीता देवी यांच्या बँक खात्यावर आलेले हे पैसे तांत्रिक चूक असावी, असे म्हटले जात आहे. या घटनेचा तपास केला जात आहे.

परंतु समोर आलेला हा प्रकार पाहून सगळेच थक्क झाले आहे. एक महिला अचानक थेट अब्जोपती झाल्याने सगळीकडे या प्रकाराची एकच चर्चा आहे. ही घटना सायबर क्राईमचाही भाग असू शकते का? याचा सोध घेतला जात आहे. सोबतच हा प्रकार बँकेच्या तांत्रिक बिघाडामुळेही झालेला असू शकतो, असा दावा केला जातोय. त्यामुळे भविष्यात याबाबत नेमकी काय माहिती समोर येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.