सातारा : किल्ले प्रतापगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे, दूरदृष्टीचे गौरवशाली प्रतीक आहे. हा किल्ला जतन व संवर्धनासाठी १२७ कोटींचा निधी मंजूर आहे. याअंतर्गत विविध कामे होत असताना किल्ल्याच्या मूळ ढाच्यात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही, याची दक्षता घेऊनच किल्ल्याचे संवर्धन करावे, अशी सूचना प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
farmer Success Story: तळेगाव ढमढेरेच्या ११ महिन्यांच्या उसाला तब्बल ₹५,००० प्रतिटन बाजारभाव; हरियाणापर्यंत झाली विक्री, शेतीतून यशाची गोड कहाणी!प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची बैठक खासदार उदयनराजे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाचे सहअध्यक्ष शंभूराज देसाई , मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, पुरातत्त्व विभागाचे सहसंचालक डॉ. विलास वाहणे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, प्राधिकरणाचे अशासकीय सदस्य मिलिंद एकबोटे, नितीन शिंदे, शरद पोंक्षे, सदाशिव टेंटविलकर, सोमनाथ धुमाळ, चंद्रकांत पाटील, विजय नायडू, अमोल जाधव, पंकज चव्हाण आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ले प्रतापगडचे बांधकाम गेले ४०० वर्षे अभेद्य आहे, असे सांगून आता जे आपण जतन व संवर्धनाचे काम करत आहोत. तेही पुढे असेच शतकानुशतके टिकले पाहिजे, असे करा, अशी सूचना पालकमंत्री देसाई यांनी केली. मंत्री पाटील म्हणाले, ‘‘शिवकाळात पार येथे बाजारपेठ होती. प्रतापगडच्या विकासकामांच्या आराखड्यात याचाही समावेश करावा, तसेच किल्ल्याशी संबंधित विविध ठिकाणांचाही पर्यटनवाढीच्या दृष्टीने या आराखड्यामध्ये समावेश करावा.’’
विविध मंदिरे ४०० वर्षांपूर्वीप्रमाणे करावीतप्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग दर्शवणारी भित्तिचित्रे उभारण्यात येणार आहेत. यास पर्यटन विभागाची मान्यता घेण्यात यावी. ‘लाइट ॲण्ड साउंड शो’साठीची स्क्रिप्ट ऐतिहासिक विषयांचे लेखन करणाऱ्या दिग्गजांकडून लिहून घेण्यात यावी. त्यास सांस्कृतिक विभागाकडून मान्यता घ्यावी. स्थानिकांना रोजगार निर्मिती व्हावी व दिव्यांग, वृद्ध यांच्या ने-आण करण्यासाठी डोलीची व्यवस्था करावी.
Milk Rate: दूध उत्पादकांना दिलासा! गायीच्या दुधाचा दर ४१ रुपयांवर; तुकाराम मुंढे इफेक्ट, राज्यातील संकलनात २० लाख लिटरची घटजुन्या तीन तलावांचे उत्खनन करावे, गाळ काढावा, तसेच त्यांचे पुनरुज्जीवन करावे. या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करून घ्यावे. जेथून छत्रपती शिवाजी महाराज दैनंदिन कामकाज करत होते. त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठीचा प्रस्ताव पुरातत्त्व खात्याला पाठवावा. या ठिकाणी असणाऱ्या विविध मंदिरांचा लूक ४०० वर्ष पूर्वीप्रमाणे असावा, अशा विविध मुद्द्यांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली.