ऐरोलीत भयंकर घटना, प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवून कटरने तुकडे, 11 महिन्यांच्या तपासानंतर दिरा
Marathi July 14, 2026 02:25 PM

वि मुंबई: नवी मुंबईतील ऐरोली परिसरातील यादवनगर परिसरात ११ महिन्यांपूर्वी घडलेल्या थरारक हत्याकांडाचा (Mumbai Crime News) अखेर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी (Mumbai Crime News) उलगडा केला आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या (Mumbai Crime News) केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेहाचे तीन तुकडे करून गवळी देव परिसरातील जंगलात फेकून पुरावे नष्ट करण्याचा (Mumbai Crime News) प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी सुनिता कुशवाह आणि तिचा प्रियकर राहुल प्रजापती यांना अटक केली असून न्यायालयाने दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.(Mumbai Crime News)

आरोपींच्या कबुलीनंतर पोलिसांनी गवळी देव डोंगर परिसरात मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. मयताच्या भावाला संशय आल्याने रबाले पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. तांत्रिक तपास, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आणि चौकशीतील विसंगतीमुळे या हत्याकांडाचा उलगडा झाला आहे.(Mumbai Crime News)

Mumbai crime News: नेमकं काय आहे प्रकरण?

ऐरोली परिसरात एका महिलेने तिच्या रिक्षाचालक प्रियकराच्या मदतीने पतीला निर्घृणपणे संपवलं. तिने एवढ्यावरच न थांबता पुरावे नष्ट करण्यासाठी पतीच्या मृतदेहाचे कटरने तीन तुकडे करून ते जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले, धक्कादायक बाब म्हणजे, या महिला आरोपीने तब्बल ११ महिने हा गुन्हा पचवला होता, मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या जोरावर अखेर या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी पत्नी सुनीता कुशवाह आणि तिचा प्रियकर राहुल दशरथ प्रजापती या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. बलीराम सूर्यनाथ कुशवाह असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे.(Mumbai Crime News)

नवी मुंबईतील ऐरोली परिसरात ११ महिन्यांपूर्वी घडलेल्या थरारक हत्याकांडाचा रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अखेर उलगडा केला आहे. अनैतिक संबंधात पती अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे कटरने तीन तुकडे करून गवळी देव डोंगर परिसरातील जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी पत्नी सुनिता कुशवाह आणि तिचा प्रियकर राहुल दशरथ प्रजापती यांना अटक केली असून न्यायालयाने दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मयताचा भाऊ संशय व्यक्त करत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) आणि चौकशीतील विसंगतींच्या आधारे या हत्याकांडाचा पर्दाफाश केला. आरोपींच्या कबुलीनंतर गवळी देव परिसरात मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

हेदेखील वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.