युरोपच्या धर्तीवर काळाघोडा परिसराचा कायापालट, ‘काळाघोडा आर्ट अव्हेन्यू’ ठरणार पर्यटकांचे आकर्षण
Marathi July 15, 2026 01:25 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला काळाघोडा परिसर म्हणजे मुंबईच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलात्मक वारशाचे प्रतीक मानला जातो. या परिसरात येणाऱ्या देशविदेशातील पर्यटकांना अधिक सुरक्षित, आनंददायी आणि युरोपच्या धर्तीवर हेरिटेज वॉकचा आनंद घेता यावा, या उद्देशाने महानगरपालिकेने विविध रस्त्यांचे व्यापक सौंदर्याकरण केले आहे. ‘काळाघोडा आर्ट अव्हेन्यू’ असे या प्रकल्पाचे नाव असून तो आज जनतेसाठी खुला झाला.

दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या काळाघोडा परिसरातील आर्ट अव्हेन्यू सौंदर्गीकरण व रोषणाई प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. काळाघोडा प्लाझा, बी. भरुचा मार्ग, मुंबई येथे हा लोकार्पण सोहळा पार पडला. या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष अॅ ड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशीष शेलार, महापौर रितू तावडे, सभागृह नेते गणेश खणकर, महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते.

खुल्या जागेत आकर्षक बैठक व्यवस्था

युरोपातील शहरांप्रमाणे रस्त्यालगतच्या कॅफे आणि उपाहारगृहांसमोर खुल्या जागेत टेबल-खुच्र्यांची बैठक व्यवस्था केली असून पर्यटकांना मोकळ्या वातावरणात खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत परिसरातील कलात्मक वातावरण अनुभवता येईल.

५०० मीटर लांबीच्या परिसरात सुशोभीकरण

पर्यटकांना अधिक समृद्ध ‘हेरिटेज वॉक’चा अनुभव मिळावा, यासाठी साईबाबा मार्ग, रोप वॉक लेन, डॉ. व्ही. बी. गांधी मार्ग (फोर्ब्स स्ट्रीट), रुदरफोर्ड स्ट्रीट आणि बी. भरुचा मार्ग या रस्त्यांचे सौंदर्याकरण केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.