Chanakya Niti : या तीन लोकांची संगत म्हणजे घराची बरबादी, कधीच नादी लागू नका
Tv9 Marathi July 15, 2026 11:45 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात या समजात जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. या जगात तीन प्रकारचे लोक असे आहेत, ज्यांच्याशी तुम्ही कधीही संगत करू नका, तुम्ही जर अशा लोकांशी संगत केली तर एक दिवस ती नक्की तुमच्या अंगलट येणार आहे. अशा लोकांची संगत तुम्हाला अडचणीत अणू शकते, हे तुमच्या लवकर लक्षात येत नाही, परंतु जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा मात्र खूप वेळ झालेला असेल आणि तुमच्यावर पश्चतापाची वेळ येईल. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहण्यातच तुमचं हीत आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आळशी लोक –  चाणक्य म्हणतात जे लोक आळशी असतात, काहीही कामधंदा करत नाही. कुटुंबाकडे त्यांचं लक्ष नसतं अशा लोकांसोबत कधीही मैत्री करू नये, असं सल्ला चाणक्य देतात. तुम्ही जर अशा लोकांसोबत मैत्री केली तर एक दिवस तुम्ही देखील अडचणीत येतात. तुम्ही देखील आळशी होऊ शकतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

विश्वासघातकी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक विश्वासघातकी असतात, अशा लोकांपासून नेहमी दूर रहावं, असे लोक तुमचा कधी विश्वासघात करतील ते सांगता येत नाही. कारण अशा लोकांची संगत ही तुम्हाला मघात पडू शकते. तुमचा विश्वासघात होऊ शकतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

मोठ्यांचा अपमान करणारे लोक – चाणक्य म्हणतात जे लोक संस्कारहीन असतात, ज्यांच्यावर संस्कार झालेले नसतात. जे आपल्या पेक्षा मोठ्या व्यक्तींचा अपमान करतात, अशा लोकांसोबत तुम्ही कधीही मैत्री करू नका, एक दिवस तुम्ही फार मोठ्या अडचणीत सापडू शकतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.