आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शन करतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात मुलं ही चिखलाच्या गोळ्याप्रमाणे असतात. जसा कुंभार एखाद्या चिखलाच्या गोळ्याला आकार देऊन त्याच्यापासून सुंदर अशी मातीची भांडी बनवतो, त्याचप्रमाणे प्रत्येक आई-वडीलांची देखील जबाबदारी असते की, आपल्या मुलांवर योग्य संस्कार त्यांनी केले पाहिजेत, तसेच त्याला योग्य आणि चांगलं शिक्षण देखील दिलं पाहिजे. ज्यामुळे मुलांचा पाया मजबूत होतो आणि भविष्यातील आवाहनाचा सामना करण्यासाठी ते सक्षम होतात. चाणक्य पुढे असंही म्हणतात की जरी मुलांना घडवण्याची जबाबदारी आई-वडिलांची असली तरी देखील मुलांचे पाय पाळण्यात दिसतात. काही मुलांमध्ये उपजतच असे काही गुण असतात, त्याच्या बळावर ते जगावर राज्य करतात, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
प्रश्र विचारणारे मुलं – चाणक्य म्हणतात ज्या मुलांना त्याच्या विद्यार्थी दशेत विविध प्रश्न पडतात, जे सारखे आपल्या शिक्षकांना किंवा आई-वडिलांना प्रश्न विचारतात. जो पर्यंत त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळून त्यांचं समाधान होत नाही, तोपर्यंत ते स्वस्त बसत नाही. अशी मुलं भविष्यात जगाचं नेतृत्व करतात. अशी मुलं समाजाचे प्रश्न उत्तमरित्या मांडू शकतात. जग देखील अशा मुलाचं नेतृत्व स्विकारतं.
दुसऱ्यांना मदत करणारी मुलं – चाणक्य म्हणतात तुमचं मुल मोठेपणी नक्की काय करणार आहे, याचा अंदाज मुलाच्या लहानपणीच येतो. जर तुमच्या मुलांना नेहमी दुसऱ्यांना मदत करायला आवडत असेल, तर समजून जा तुमचा मुलगा भविष्यात समाजाचं नेतृत्व करू शकतो. अशी लोकं स्वत: पुढाकार घेऊन जगाचं नेतृत्व स्वीकारतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
कधीही पराभव मान्य न करणे – चाणक्य म्हणतात तुमचं मुल जर पराभवाला घाबरत नसेल, एखाद्यावेळी जर त्याचा पराभव झाला तर तो त्यातून योग्य धडा घेऊन पुढच्यावेळी अधिक परिश्रम करत असेल, आपल्या कार्यातून इतरांना प्रेरणा देत असेल तर समजून जा तुमचं मुलं नक्कीच मोठेपणी गावाचं, शहराचं, राज्याचं किंवा देशाचं देखील नेतृत्व करू शकतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)