IRCTC ची नवीन वेबसाइट सुरू झाली नवी दिल्ली : भारतीय रेल्वेकडून ऑनलाईन तिकीट बुकिंग व्यवस्था आधुनिक करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. भारतीय रेल्वेच्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझ्म कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसकडून नव्या वेबसाईटचं बीटा व्हर्जन लाँच करण्यात आलं आहे. या नव्या वेबसाईटवर नवीन डिझाईन फीचर्सचा अनुभव घेता येईल याशिवाय सूचना देखील देता येतील. नव्या वेबसाईटचं बीटा व्हर्जन https://www.irctc.co.in/eticket/ वर उपलब्ध असेल. याशिवाय आयआरसीटीसीच्या वेबसाईटच्या होमपेजवर बीटा व्हर्जनची लिंक देण्यात आली आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, वेबसाईटमधून महत्वाच्या सुधारणा MNIT, जयपूरच्या विद्यार्थ्यांच्या सूचनेनंतर करण्यात आल्या आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत विद्यार्थ्यांनी चर्चा केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना वेबसाईट डिझाईन आणि यूजर एक्सपीरिअन्सला अधिक उत्कृष्ठ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आयआरसीटीसीची सध्या सुरु असलेली वेबसाईट 2002 मध्ये सुरु झाली होती. त्या वेबसाईटवर प्रतिदिन 14.5 लाख तिकीट बुकिंग होतात.
नवी वेबसाईट अधिक सोपी, वेगवान आणि यूजर्स फ्रेंडली करण्यात आली होती. बीटा व्हर्जनमध्ये चार मोठे बदल करण्यात आले आहेत. अनावश्यक कॅप्चा, पॉप-अप, फ्लॅशिंग ग्राफिक्स, लक्ष विचलित करणारे एलिमेंटस हटवण्यात आले आहेत. एकाच स्क्रीनवर सर्व क्लास म्हणजेच श्रेणीतील तिकीटची उपलब्धता दिसून येईल. प्रवाशांची माहिती पहिल्यापासून सेव्ह असेल त्यामुळं दुसऱ्यांदा तिकीट बुक करताना अधिक माहिती भरण्याची आवश्यकता नसेल.
रेल्वे मंत्रालयाकडून बीटा व्हर्जन लाँच करण्यात आलं आहे, त्याचा उद्देश प्रवाशांकडून सूचना आणि फीडबॅक मिळवणं आहे, असं सांगण्यात आलं आहे. अंतिम व्हर्जन लाँच करताना त्यामध्ये अपडेटेशन केलं जाईल. ज्यामुळं यूजर्सला चांगला अनुभव मिळेल.
याशिवाय भारतीय रेल्वेकडून समांतर पद्धतीनं पॅसेंजर रिझर्व्हेशन इंजिनचं आधुनिकीकरण करण्यात येत आहे. कारण ही सिस्टीम वेगवेगळ्या प्रकारे ट्रेन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म्सला संचलित केलं जातं, त्याला देखील लाँच केलं जाईल.
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, आयआरसीटीसीची वेबसाईट आणि नवीन पॅसेंजर रिझर्व्हेशन इंजिन पूर्णपणे एकीकृत झाल्यानंतर तिकीट बुकिंग अधिक वेगवान, सोपी आणि आधुनिक ऑनलाईन तिकिट बुकिंगचा अनुभव मिळेल. आयआरसीटीसीचं नवं पोर्टल पुढील आठवड्यात उपलब्ध करुन दिलं जाईल. रेल्वेनं प्रवाशांना यूजर्सला नवी वेबसाईट वापरण्याचा आणि शिफारस करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.