कन्नड - केंद्र शासन पुरस्कृत 'अमृत २.०' अभियानांतर्गत कन्नड नगरपरिषदेच्या शिवना–टाकळी अतिरिक्त पाणीपुरवठा योजनेस अखेर ५६ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आमदार संजना जाधव यांनी केलेल्या अत्यंत प्रभावी आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या योजनेचा मार्ग मोकळा झाला असून, यामुळे कन्नड शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
कन्नड शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन शहरासाठी सक्षम व अतिरिक्त पाणीपुरवठा योजना असणे अत्यंत गरजेचे होते. हीच गरज ओळखून आमदार संजना जाधव यांनी शासन दरबारी या योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून, ५६ कोटी रुपयांच्या भरीव निधीला मंजुरी मिळाली आहे. या योजनेमुळे शहराला शिवना-टाकळी प्रकल्पातून अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असून नागरिकांना अधिक नियमित, शुद्ध आणि सक्षम पाणीपुरवठा मिळणार आहे. शहराच्या विकासाला गती देणारा आणि नागरिकांना मोठा दिलासा देणारा हा निर्णय ठरला आहे.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये -
योजनेचे नाव - शिवना–टाकळी अतिरिक्त पाणीपुरवठा योजना.
मंजुर निधी - ५६ कोटी.
अभियान - केंद्र पुरस्कृत अमृत २.० (AMRUT 2.0).
मुख्य उद्देश - कन्नड शहरातील नागरिकांना नियमित व सक्षम पाणीपुरवठा करणे.
प्रतिक्रिया -
'हा निर्णय जनहिताचा आणि विकासाला गती देणारा!'
'कन्नड शहराचा पाणीप्रश्न सोडवणे हे आमचे मुख्य ध्येय होते. शिवना-टाकळी अतिरिक्त पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरीमुळे शहराला अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असून नागरिकांची मोठी गैरसोय दूर होईल. शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन घेण्यात आलेला हा निर्णय निश्चितच जनहिताचा आणि विकासाला गती देणारा आहे.