एका महिन्यात देशाने अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठले, प्रत्येक भारतीयाला अभिमान, नरेंद्र मोदींचे मोठे विधान..
Tv9 Marathi July 20, 2026 02:45 PM

आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. यासोबतच दिल्लीमध्ये जंतरमंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. संसदेच्या दिशेने मोर्चा निघाला असून पोलिसांनी या मोर्चाला पांगवले आहे. थेट लाठीचार्जही केला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, मान्सून असो किंवा संसदेचे पावसाळी अधिवेशन… जर दोन्ही सक्रिय असतील तर अत्यंत फलदायी ठरते. जेव्हा दोन्ही फलदायी असतात, तेव्हा त्यातून राष्ट्राचे कल्याण व सर्व हित साधले जाते. मान्सून सक्रिय राहावा आणि पावसाळी अधिवेशन फलदायी ठरावे, अशी प्रार्थना करतो, असे नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच म्हटले. नरेंद्र मोदी यांनी पुढे म्हटले की, गेल्या एका महिन्यात देशाने अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत. अनेक यशांचा मोठा टप्पा पार केला. ज्यामुळे नागरिकांच्या मनात अभिमान आहे. राष्ट्रीय असो वा आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आता अवकाशातही हे सर्व भारतासाठी खरोखरच अभिमानाचे क्षण आहे.

पुढे नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशनापूर्वी भारतीय नागरिक आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचला. एका तरुण भारतीय स्टार्टअप कंपनीने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. हा एक मोठा संदेश आहे. हा एक प्रभावी संदेश नक्कीच आहे की, आपल्या देशातील तरूणांची क्षमता आणि त्यांची स्वप्ने अंतराप्रमाणे मोठी आणि अफाट आहेत.

एकीकडे संसद परिसरात तणाव आहे. मोठे आंदोलन जंतरमंतरमध्ये सुरू होते. त्यानंतर मोर्चाला परवानगी नसतानाही संसदेच्या दिशेने मोर्चा निघाला. पोलिसांकडून आंदोलकांना लाठीचार्ज करत पांगवण्यात आले. मात्र, गर्दी काही कमी होण्याचे नाव घेत नाही. मोठा पोलिस बंदोबस्त आहे.

नीट पेपरफुटीविरोधात हे आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याकरिता हे आंदोलन सुरू आहे. सध्या सोनम वांगचुक यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी सोशल मीडियावर सकाळीच एक पोस्ट शेअर करत सरकार पुढे काही अटी ठेवल्या आहेत. त्यांनी आंदोलन मागे घेण्यावर भाष्य केले. पण सरकारला त्यापूर्वी वांगकुच यांच्या 3 अटी या मान्य कराव्या लागतील.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.