Sankarshan Karhade Son Viral Video: अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) याने नाटक, शो आणि मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. अभिनयाव्यतिरिक्त अभिनेत्याच्या कविताही सोशल मीडियात व्हायरल (Social Media) होत असतात. तो आपल्या कवितांचे व्हिडीओ तयार करुन प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. सध्या मराठी अभिनेता 'नियम व अटी लागू' आणि 'कुटुंब किर्तन' या दोन्ही नाटकांच्या कामात व्यग्र आहे. या खास दोन्ही नाटकांसाठी तो महाराष्ट्रभर दौरा करत आहे. या दोन्ही नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रातील अनेक भागांत होत आहे. संकर्षण कऱ्हाडेचं या दोन्ही नाटकांसाठी विशेष कौतुक होत आहे.
नाटक झाल्यानंतर बऱ्याचदा रसिकप्रेक्षक कलाकारांना भेटून त्यांचं कौतुक करतात. नाटक नेमकं कसं वाटलं, हे थोडक्यात सांगतात. आपल्या चाहत्यांबाबत सोशल मीडियाच्या पोस्टमधून संकर्षण कऱ्हाडे शेअर करतो, सांगत असतो. नुकतंच संकर्षण कऱ्हाडेने आपल्या मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. मंचावर वडिलांची एन्ट्री होताच, संकर्षण कऱ्हाडेच्या मुलाला कसा आनंद होतो? हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.
संकर्षण कऱ्हाडेने आपल्या मुलाचा हा व्हिडीओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. सध्या संकर्षण कऱ्हाडेचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, 'कुटुंब किर्तन' या नाटकाचा प्रयोग सुरु असतं. संकर्षण कऱ्हाडेचा मुलगा हा आपल्या आईजवळ बसलेला आहे. या नाटकाच्यावेळी मंचावर संकर्षणची एन्ट्री होते. हे पाहून संकर्षणचा मुलगा प्रचंड खूश होतो.
View this post on Instagram
वडिलांना पाहताच त्याच्या डोळ्यात एक वेगळाच उत्साह आणि आनंद पाहायला मिळत आहे. तो आनंदाने टाळ्या वाजवू लागतो. सोबत त्याची बहीणही खूश होती. ती देखील आनंदाने टाळ्या वाजवू लागते. हा क्षण संकर्षण कऱ्हाडेच्या बायकोने कॅमेऱ्यात कैद केला आहे. संकर्षणने हा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे. संकर्षणने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एकाने कमेंटमध्ये म्हटलं की, 'तुझा मुलगा हा तुझ्यासारखाच दिसतो'. तर आणखी एका युझरने, 'तुझा मुलगा तुझा फोटोकॉपी आहे', असं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक