वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
जयदीप मेढे July 26, 2026 09:13 PM

Zimbabwe vs India, 3rd T20I: सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या 81 धावांच्या खेळीमुळे भारताने तिसऱ्या टी20 सामन्यात झिम्बाब्वेसमोर 193 धावांचे लक्ष्य ठेवले. हरारे येथे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून 192 धावा केल्या. वैभवने आपल्या 49 चेंडूंतील 81 धावांच्या खेळीत 8 चौकार आणि 4 षटकार मारले. वैभवसोबत इशान किशनने 29 धावा आणि कर्णधार श्रेयस अय्यरने 27 धावा केल्या. तिलक वर्मा 11 धावांवर नाबाद राहिला. या मालिकेतील पहिल्या सामन्यातही वैभवने धमाकेदार अर्धशतक झळकावले होते.

भारताची सुरुवात खराब झाली

अभिषेक शर्मा 2 धावांवर बाद झाल्याने भारताची सुरुवात खराब झाली. त्यानंतर वैभव आणि इशानने दुसऱ्या विकेटसाठी 75 धावा जोडून डाव सावरला. ईशान बाद झाल्यानंतर, वैभवने कर्णधार श्रेयस अय्यरसोबत 50 धावा जोडून 31 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. झिम्बाब्वेकडून ब्रॅड इव्हान्सने दोन बळी घेतले, तर ब्लेसिंग मुझारबानी, सिकंदर रझा आणि वेस्ली माधेवेरे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. हरारे स्पोर्ट्स क्लब येथे भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात आले. सूर्यांश शेडगे आणि अशोक शर्मा यांचा अंतिम 11 खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला.  

अभिषेक शर्मा अपयशी ठरला

अभिषेक शर्माचा झिम्बाब्वे दौरा निराशाजनक ठरला आहे. मालिकेतील अंतिम सामन्यातही अभिषेक फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकला नाही. तो केवळ 2 धावांवर असताना ब्लेसिंग मुझारबानीच्या गोलंदाजीवर तादिवनशे मारुमानीकरवी झेलबाद झाला.  

भारतीय फलंदाजांचे वर्चस्व

दरम्यान, मालिकेतील दुसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 219 धावा केल्या. इशान किशनच्या 81 आणि तिलक वर्माच्या नाबाद 60 धावांच्या जोरावर भारतीय संघ 219 धावांपर्यंत पोहोचू शकला.  

झिम्बाब्वेला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले

220 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना, भारतीय गोलंदाजीने झिम्बाब्वेला अवघ्या 129 धावांवर सर्वबाद केले. भारताने हा सामना 90 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.